आंतरराष्ट्रीय कोर्ट

कुलभूषण जाधवप्रकरणी भारत आज आंतरराष्ट्रीय कोर्टात रिपोर्ट सोपवणार

पाकिस्तानच्या तुरूंगात बंदिस्त असलेला भारतीय नागरिक कुलभूषण जाधवप्रकरणी भारत आज आंतरराष्ट्रीय कोर्टात रिपोर्ट सोपवणार आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टानं यापूर्वी भारताच्या बाजूनं निकाल देताना 13 सप्टेंबरपर्यंत बाजू मांडण्याचा अवधी दिला होता. त्यानंतर 13 डिसेंबरपर्यंत पाकिस्तानला आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कोर्ट आपला निकाल देणार आहे.

Sep 13, 2017, 12:19 PM IST

कुलभूषण जाधव प्रकरणी धक्का, फोडले वकिलावर खापर...

 आंतरराष्ट्रीय कोर्टात कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या आदेशाला स्थिगिती मिळाली आहे. या निर्णयानंतर पाकिस्तान बिथरले आहे. सरकार ते नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे.  आता पाकिस्तानच्या विविध पक्षांचे नेते आणि जाणकार हा दावा करतात आहे की, त्यांचे सरकार योग्य प्रकारे आंतरराष्ट्रीय कोर्टात आपली बाजू मांडण्यात अपयशी ठरले. त्यामुळे कोर्टाने भारताच्या बाजूने निकाल दिला आहे. 

May 18, 2017, 07:30 PM IST

पाकिस्तानचा रडीचा डाव, पाहा काय केलं

 आंतरराष्ट्रीय कोर्टानं चपराक लगावल्यानंतरही पाकिस्तानचा रडीचा डाव सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल पाकिस्तानला मान्य नसल्याचं पाक परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नफीज झकेरीयांनी सांगितलंय.

May 18, 2017, 07:01 PM IST

कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात उद्या लागणार निकाल

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील खटल्याबाबत उद्या आंतरराष्ट्रीय कोर्टात निकाल जाहीर होणार आहे. तीन दिवसांच्या सुनावणीनंतर उद्या निकाल जाहीर केला जाणार आहे. 

May 17, 2017, 08:56 PM IST

कुलभूषण जाधवप्रकरणी आज आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणी

आज कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी आहे. कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचेचे भारताने दरवाजे ठोठावले आहेत. न्यायालयानेही जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.

May 15, 2017, 08:45 AM IST