नाशिक निवडणूक

नाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेनेची आघाडी, भाजप चौथ्या स्थानावर

विधानपरिषदच्या नाशिक शिक्षक मतदार संघातून शिवसेनेने आघाडी घेतली आहे. मात्र, भाजप उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. तर राष्ट्रवादीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथे अपक्षांने भाजपपेक्षा जास्त मतांनी आघाडी घेतलेय.

Jun 28, 2018, 06:02 PM IST

नाशकात अपक्षांशी हातमिळवणी करून बाजी मारण्याची तयारी

निवडणुका म्हटल्यावर तिकीट वाटपात कोणावर तरी अन्याय होतोच. मग असंतुष्टांकडून आखली जाते अधिकृत उमेदवारांना पाडण्याची रणनिती. अशी परिस्थिती नाशिक मनपा निवडणुकीत अनेक प्रभागात निर्माण झाली आहे. 122 जागांसाठी 821 उमेदवार नशिब आजमावत आहेत. त्यात तीनशेहून अधिक अपक्ष आहेत. यात पंधरा ते वीस माजी नगरसेवकांचाही समावेश आहे.

Feb 9, 2017, 01:18 PM IST

नाशिककरांना पाहता येणार उमेदवारांचे क्रिमिनल रेकॉर्ड

महापालिकेसाठी उभ्या असलेल्या सर्वच उमेदवारांची माहिती आता पोलिसांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ऩाशिककरांना आता त्यांच्या प्रभागात उभ्या असलेल्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड पाहता येणार आहे. नाशिकमध्ये भाजप, शिवसेना यांनी अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीटं दिली आहेत.

Feb 9, 2017, 10:41 AM IST