निवडणूक निकालाचे सावट

मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांवर निवडणूक निकालाचे सावट

मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांवर मुंबई महापालिका निकालाचे सावट जाणवून येत आहे. महापालिकेत सत्ता कशी स्थापन करायची याची शिवसेनेत चिंता आहे. तर अपयशामुळे मनसेत यंदा मराठी भाषा दिन साजरा करण्यात तितकासा उत्साह नाही. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार संघटनेनं प्रथेप्रमाणे आज सायंकाळी रंगशारदा सभागृहात 'गर्जते आई मराठी' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

Feb 27, 2017, 11:16 AM IST