मंत्रालयाला भीषण आग

मंत्रालयाची भीषण आग नियंत्रणात

मंत्रालयाला लागलेली आग नियंत्रणात आणण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव बांठिया यांनी दिली. या आगीची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही देण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले.

Mar 9, 2013, 01:22 PM IST

मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी जाहीर

मंत्रालयाच्या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. तसंच मंत्रालय आज सुरू असणार आहे. पण सर्वसामान्य लोकांसाठी मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रालयाचा विस्तार कक्ष सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

Jun 22, 2012, 11:55 AM IST

मंत्रालयातील आगीतील जखमींची नावे

www.24taas.com,मुंबई 

मंत्रालयातील आगीतील जखमींची नावे |

अशोक पिसाट -  समन्वयक, जलसंपदा |

किशोर रमेश गांगुर्डे – जनसंपर्क अधिकारी, गृह मंत्रालय - उजव्या गुडघ्याला मार |

सतीश लळीत – जनसंपर्क अधिकारी, मुख्यमंत्री |

हेमंत खैरे |

अविनाश सुर्वे

| श्रीधर सुर्वे

Jun 22, 2012, 07:22 AM IST

मंत्रालयाचा विमाच नाही!

महाराष्ट्रातील अनेक मोठ्या प्रकल्पांचे आणि प्रकरणांची कागदपत्र असणाऱ्या मंत्रालयाला आज दुपारी आग लागली. या आगीत अनेक कागदपत्रे खाक झाली. अनेक मोठ्या वास्तूंचा आणि त्यातील वस्तूंचा विमा उतरविला जातो. परंतु, मंत्रालयाचा विमाच उतरविला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jun 22, 2012, 07:22 AM IST

मंत्रालयातील आगीत तिघांचा मृत्यू

मंत्रालयातील आगीत तीघांचा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर हे दोन मृतदेह सापडले असून अजून त्यांची ओळख पटलेली नाही. तर तिसरा व्यक्ती संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

Jun 21, 2012, 10:56 PM IST

मंत्रालयाच्या आगीत २४ जण गंभीर जखमी

मुंबईत मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावर भीषण आग लागल्याचे वृत्त थोड्याच वेळापूर्वी हाती आली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. ही आग अत्यंत भीषण आहे.

Jun 21, 2012, 06:40 PM IST

LIVE : सिक्युरिटी-फायर ऑडिट झालंच नव्हतं...

मंत्रालयाला लागलेल्या आगीबाबत आता नवानवा खुलासा होताना दिसतोय. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार मंत्रालयाचं सिक्युरिटी आणि फायर ऑडिट झालंच नव्हतं असं समजतंय. तसंच तातडीनं उपाययोजना झाल्या नाहीत आणि त्यामुळेच आगीनं उग्र स्वरुपाचं रुप धारण केलं, हेही आता स्पष्ट झालंय.

Jun 21, 2012, 06:40 PM IST

'आदर्श'ची कागदपत्रे सुरक्षित?

महाराष्ट्राच्या मंत्रालयाला आज दुपारी लागलेल्या आगीत वादग्रस्त आदर्श सोसायटीचे कागदपत्रही जळाले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.

Jun 21, 2012, 06:38 PM IST