स्वाईन फ्ल्यू

 Nagpur And Pune Swine Flu 8 Death PT2M26S

नागपूर । राज्यात पुन्हा स्वाईन फ्ल्यूचे संकट, विदर्भात ८ जणांचा मृत्यू

राज्यात पुन्हा एकदा स्वाईन फ्ल्यूने डोके वर काढल्याचे चित्र आहे. राज्यावर स्वाईन फ्लूचे पुन्हा एकदा संकट आले आहे. गेल्या २२ दिवसांत २६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नागपुरात ८ जणांचा मृत्यू तर सर्वाधिक रुग्ण पुण्यात असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, आरोग्य विभागाकडून रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. देशभरात स्वाईन फ्लूचा फैलाव वाढला आहे. स्वाईन फ्लूने देशात आतापर्यंत ७७ बळी घेतले आहेत. राज्यातल्या पुणे आणि नागपूर शहरांमध्येही स्वाईन फ्लूच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. स्वाईन फ्लूच्या रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाचीही चिंता वाढली आहे.

Jan 26, 2019, 12:00 AM IST

स्वाईन फ्ल्यूमुळे भाजप आमदाराचा मृत्यू

राजस्थानमध्ये देखील स्वाईन फ्ल्यूचं थैमान आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे मृतांचा आकडा वाढत आहे. भीलवाडामधील मांडलगडच्या भाजप आमदार किर्ती कुमारी यांचा देखील स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाला आहे. मांडलगडच्या बिजौलिया राजघराण्याच्या राजकुमारी कीर्ती या ३ वेळा भाजपच्या आमदार म्हणून निवडूण आल्या आहेत.

Aug 28, 2017, 03:54 PM IST

स्वाईन फ्ल्यूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना

स्वाईन फ्ल्यूच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी राज्यातील जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी आणि संबंधित इतर अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून दिल्या. तसेच स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी आवश्यक औषधे कमी पडू नयेत, यासाठी स्थानिक पातळीवर औषध खरेदी तसेच आवश्यकता वाटल्यास खासगी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासही मान्यता दिली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Apr 16, 2017, 08:35 AM IST