2022 Audi A8 L: ऑडीने यावर्षी भारतात आपली 15 वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने कंपनीने Audi A8 L कार सादर केली आहे. प्रीमियम कार निर्मात्या ऑडीने आपली लोकप्रिय आणि प्रीमियम सेडान कार 2022 Audi A8 L भारतात लाँच केली आहे. कंपनीने 1.29 कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीसह बाजारात लाँच केली आहे. सेलिब्रेशन एडिशन आणि टेक्नॉलॉजी एडिशन या दोन प्रकारांमध्ये ही कार सादर करण्यात आली आहे. टेक्नॉलॉजी एडिशनची एक्स-शोरूम किंमत 1.57 कोटी रुपये आहे. ही कार आठ मानक रंगांमध्ये उपलब्ध आहे. Audi A8 L ची भारतातील Mercedes-Benz S-Class, BMW 7-Series, Jaguar XJ आणि Lexus LS यांच्याशी स्पर्धा असेल.
कारमधील खास वैशिष्ट्ये
कारमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. कारमध्ये ऑडी फोन बॉक्स बसवला आहे ज्यामध्ये मोबाईल फोन वायरलेस चार्जरने चार्ज केला जाऊ शकतो. कारला मीडिया आणि क्लायमेट कंट्रोल सिस्टीम, पॅनोरामिक सनरूफ, टेल लाईट सिग्नेचरसह ओएलईडी रिअर लाइट, डिजिटल मॅट्रिक्स एलईडी हेडलाइट्स, फर्स्ट क्लास केबिन, आरामदायी सीट्स आहेत. एक अतिशय खास वैशिष्ट्य म्हणजे फुट मसाज. दुसऱ्या रांगेच्या बाजूच्या प्रवासी सीटमध्ये तीन फूट आकाराची हिटेड फुट मसाज सिस्टीम बसवली आहे.
कार इंजिन
2022 Audi A8 L फेसलिफ्ट कार 3.0-लिटर TFSI (पेट्रोल) 48V माइल्ड-हायब्रिड इंजिनद्वारे समर्थित आहे. त्याचे इंजिन 340 एचपी आणि 500 एनएम टॉर्क जनरेट करते. ही कार 5.7 सेकंदात 0 ते 100 किमीचा वेग पकडते.
The wait is over. A new epitome of luxury, sophistication and comfort has arrived. Make way for ‘Space For Progress’, with the all new Audi A8 L. Now in India. #AudiA8L #FutureIsAnAttitude pic.twitter.com/PEPzVhPZ35
— Audi India (@AudiIN) July 14, 2022
उत्तम सुरक्षा व्यवस्था
अपघात झाल्यास, दुखापतीचा धोका कमी करण्यासाठी ऑडीचे प्री सेन्स बेसिक काही सेकंदात सक्रिय करते. पुढील आणि मागील सीटबेल्टला संरक्षणात्मक पद्धतीने आपोआप घट्ट करण्याचा पर्याय देखील आहे. कारमध्ये एकूण 8 एअरबॅग्ज आहेत . हे 10 एअरबॅग्स पर्यंत अपग्रेड केले जाऊ शकते. कार पार्क असिस्ट प्लस सुविधेसह देखील येते.