Airtel चे 4 सिक्रेट प्लॅन, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगच नाही तर मिळतोय जास्त डेटा

एअरटेल कंपनीने नुकतेच आपल्या प्लॅनमध्ये बदल केला आहे. मात्र असे काही सिक्रेट प्लॅन आहेत ज्यामध्ये तुम्हाला जास्तीचा डेटा अजूनही मिळू शकतो. 

Updated: Nov 27, 2021, 08:26 PM IST
Airtel चे 4 सिक्रेट प्लॅन, ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगच नाही तर मिळतोय जास्त डेटा

मुंबई: एअरटेल कंपनीने नुकतेच आपल्या प्लॅनमध्ये बदल केला आहे. मात्र असे काही सिक्रेट प्लॅन आहेत ज्यामध्ये तुम्हाला जास्तीचा डेटा अजूनही मिळू शकतो. हे प्लॅन जर तुम्हाला कोणते आहेत ते माहिती नसतील तर आजच जाणून घ्या. त्याचा फायदा तुम्हाला दुप्पट होणार आहे. 

265 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळते. 1.5 GB डेटा आणि त्यासोबत अनलिमिटेड कॉलिंगची सेवा मिळते. 100 SMS तुम्ही करू शकता. शिवाय फ्री हॅलो ट्युन्स आणि विकी म्युझिक 30 दिवसांसाठी फ्री मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना 28 दिवस अनलिमिटेड कॉलिंगही मिळणार आहे. 

299 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
यामध्ये ग्राहकांना 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. 2 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सेवा देण्यात आलं आहे. शिवाय 100 SMS महिन्याला फ्री मिळणार आहेत.  Prime Edition Free Trial, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक देण्यात आला आहे. Apollo 24|7 Circle, Wynk Music Free फ्री देण्यात आलं आहे.

719 आणि 839 प्रीपेड प्लॅन: या दोन्हीमध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळणार आहे. याशिवाय 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे. Prime Edition Free Trial, Free Hello Tunes आणि Wynk Music Free सब्स्क्रिप्शन मिळणार आहे. तुम्हाला जर अतिरिक्त डेटाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एअरटेल थँक्स अॅपवरून रिचार्ज करावा लागेल.

या रिचार्जनंतर तुम्हाला अतिरिक्त डेटा वापरण्यासाठी काही कुपन मिळतील. ही कुपन आपण आपला पॅक संपण्यापूर्वी वापरायला हवीत. याशिवाय काही रिचार्जवर तर 50 रुपये ऑफची ऑफर असणारं कुपन देखील मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिरिक्त माहितीसाठी हे अॅप वापरू शकता.