एअरटेलने आणलाय 'छप्परफाड' प्लान

ग्राहकांना कमी पैशांत अधिकाधिक इंटरनेट डेटा देण्याची स्पर्धा जणू कंपन्यांमध्ये सुरु झालीये. इंटरनेट डेटाचे दररोज नवे नवे प्लान आणून कंपन्या एकमेकांवर कुरघोडी करतायत. यातच एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणलीये.

Updated: Nov 7, 2017, 05:46 PM IST
एअरटेलने आणलाय 'छप्परफाड' प्लान

मुंबई : ग्राहकांना कमी पैशांत अधिकाधिक इंटरनेट डेटा देण्याची स्पर्धा जणू कंपन्यांमध्ये सुरु झालीये. इंटरनेट डेटाचे दररोज नवे नवे प्लान आणून कंपन्या एकमेकांवर कुरघोडी करतायत. यातच एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर आणलीये.

एअरटेलने ४४८ रुपयांचा नवा प्लान आणण्यासोबतच ३४९ रुपयांचा प्लानही रिव्हाईज केलाय. ४४८ रुपयांच्या नव्या प्लानमध्ये ७० दिवसांसाठी दररोज ३०० कॉल मोफत मिळणार आहेत. तसेच दिवसाला १ जीबी डेटा मिळणार आहे. इतकंच नव्हे तर एक जीबी डेटा संपल्यास तुमचे नेट बंद होणार आहे मात्र स्पीड कमी होईल. 

एक जीबीचा वापर झाल्यानंतर इंटरनेटचा स्पीड ६४ केबीपीएस होईल. तसेच रिव्हाईज करण्यात आलेल्या ३४९ रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्स २८ दिवसांसाठी दररोज १.५ जीबी डेटाचा वापर करु शकणार आहेत. याआधी या प्लानमध्ये दिवसाला एक जीबी डेटा दिला जात होता. या प्लानमध्ये रोमिंगही फ्री आहे. तसेच आठवड्याला तुम्ही १२०० कॉल फ्री होते.