मुंबई: सर्वात लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म म्हणजे Amazon Prime या प्लॅटफॉर्मवरून युझर्सना खूप नव नवीन सेवा कंपनीकडून देण्यात येतात. आता या कंपनीने युझर्ससाठी आणि क्रिकेटप्रेमींसाठी नवीन सेवा सुरू केली आहे. 1 जानेवारी 2022 पासून तुमच्याकडे जर अमेझॉन प्राईम असेल तर तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.
नव्या वर्षाच्या सुरुवातीला Amazon Prime ने खास क्रिकेटचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार अशी गुडन्यूज दिली आहे. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला क्रिकेट एकदिवसीय सामन्याचं, कसोटी आणि टी 20 सीरिजचं देखील स्ट्रिमिंग लाईव्ह करण्यात येणार आहे.
प्राईम युझर्सना LIVE मॅचचा आनंद घेता येणार आहे. प्राईम मेंबर्सना बांग्लादेशचा जानेवारी 2022 चा दौरा, फेब्रुवारी 2022 मधील दक्षिण आफ्रिका दौरा, मार्च 2022 मध्ये होणारा ऑस्ट्रेलिया दौरा आणि तिथले सामने तुम्हाला अॅमेझॉनवर पाहता येणार आहेत.
न्यूझीलंड विरुद्ध बांग्लादेश हा पहिला सामना Amazon Prime वर पाहता येणार आहे. मॅच संपल्यानंतर हायलाइट्स देखील पाहू शकता. आता हॉटस्टार व्यतिरिक्त अॅमेझॉन प्राईमवरही तुम्हाला क्रिकेटचे अपडेट्स पाहायला मिळणार आहेत.