नवी दिल्ली : जर तुम्ही चीनी स्मार्टफोन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण केंद्र सरकारने स्मार्टफोन बनवणाऱ्या चीनी कंपन्यांना नोटीस बजावलीये. या कंपन्या आपल्या स्मार्टफोनद्वारे ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरत असल्याचा संशय सरकारला आहे.
सरकारने ओप्पो, व्हिवो, श्योमी आणि जिओनी सारख्या चीनी कंपन्यांना नोटीस पाठवत त्यांच्याकडून याप्रकरणी उत्तर मागितलेय. स्मार्टफोन बनवणाऱ्या अधिकतर कंपन्या चीनच्या आहेत. त्यामुळे या कंपन्या ग्राहकांची माहिती हॅक करु शकतात अशी भीती सरकारला आहे. भारतात कोट्यावधी लोक स्मार्टफोन वापरतात. स्मार्टफोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट आणि मेसेजेसमधील वैयक्तिक माहिती चोरली जात असल्याचा संशय सरकारने व्यक्त केलाय.
दरम्यान, केवळ चीनी कंपन्यांनाच ही नोटीस पाठवण्यात आलेली नाहीये तर स्मार्टफोन बनवणाऱ्या दुसऱ्या कंपन्या अॅपल, सॅमसंग आणि भारताचीच मायक्रोमॅक्ससारख्या २१ कंपन्यांचा यात समावेश आहे.