Auto Tips: तुमच्याकडे इलेक्ट्रिक कार आहे? 'या' टिप्स वापरून मिळवा Maximum रेंज

इलेक्ट्रिक कार चालवताना काही बाबींकडे लक्ष दिल्यास आणखी चांगली रेंज मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत. 

Updated: Jul 31, 2022, 01:05 PM IST
Auto Tips: तुमच्याकडे इलेक्ट्रिक कार आहे? 'या' टिप्स वापरून मिळवा Maximum रेंज title=

Electric Car Range Boost Tips: गेल्या काही दिवसात पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती पाहता ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक कार खरेदीकडे आहे. इलेक्ट्रिक कार महाग असली तरी इंधनाच्या दृष्टीने विचार केल्यास परवडणारी आहे. दुसरीकडे इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी सरकारकडून अनुदान देखील दिलं आहे. त्यामुळे रस्त्यावर इलेक्ट्रिक कार धावताना दिसत आहेत. इतकंच नाही तर इलेक्ट्रिक कारची रेंजही चांगली आहे. पण इलेक्ट्रिक कार चालवताना काही बाबींकडे लक्ष दिल्यास आणखी चांगली रेंज मिळू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत. 

कधीही गाडी ओव्हरलोड करू नका: तुमच्या गाडीमध्ये तुम्ही क्षमतेपेक्षा जास्त वजन घेतलं तर त्याचा परिणाम रेंजवर होतो. कारण वजनामुळे गाडीची शक्ति वजन वाहून नेण्यात लागते आणि त्याचा थेट परिणाम रेंजवर होतो. त्यामुळे गाडीत दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त पॅसेंजर बसवू नका. जर क्षमतेपेक्षा जास्त लोकं बसवले तर 100 किमी रेंज देत असेल, तिथे 60 ते 70 किमी रेंज देईल. यामुळे वजनाचा किती फटका बसू शकतो याचा अंदाज येईल. त्यामुळे लांबचा प्रवासाला जाताना ही बाब कायम लक्षात ठेवा. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

इकोनॉमी मोडमध्ये गाडी चालवा: तुम्ही जर गाडी चालवत असाल तर गाडीतील मोड नक्कीच पाहिले असतील. प्रत्येक मोडमध्ये गाडी वेगवेगळा मायलेज देते. त्यापैकी इकोनॉमी मोड चांगल्या रेंजसाठी फायदेशीर आहे. या मोडमध्ये कारचा वेग 40 किमी प्रतितास ते 50 किमी प्रतितास वेग ठेवला तर नक्कीच फायदा होईल. कारण या मोडमध्ये जास्त वेग वाढवल्यास जास्त उर्जा लागते. त्यामुळे बॅटरी टिकवायची असल्यास या वेगाने गाडी चालवावी, त्यामुळे चांगली रेंज मिळते. 

इलेक्ट्रिक कार चालवताना या दोन टिप्स वापरल्या तर नक्कीच चांगली रेंज मिळेल. त्यामुळे गाडी ओव्हरलोड आणि इकोनॉमी मोड या बाबी लक्षात घेऊन गाडी चालवा.