चुकूनही या 5 वॅक्सिन एप्स लिंक डाऊनलोड करु नका

 याचा फायदा बरेच फसवे इंटरनेट हॅकर्स घेत आहेत. 

Updated: May 15, 2021, 11:11 AM IST
चुकूनही या 5 वॅक्सिन एप्स लिंक डाऊनलोड करु नका title=

मुंबई : कोरोनाची (Covid-19)दुसरी लाट येताच सरकारने लसीकरणाची (Vaccination) प्रक्रिया वेगाने वाढविली. अशा परिस्थितीत सरकारने सर्वांना ऑनलाईन नोंदणी करण्यास सांगितले. कोरोनाच्या सतत वाढत्या केसेसमुळे नोंदणीमध्ये वाढ होऊ लागली. पण आता प्रत्येकजणांना सहज स्लॉट उपलब्ध होत नाहीय. याचा फायदा बरेच फसवे इंटरनेट हॅकर्स घेत आहेत. जे बनावट एपीके फाइल्सद्वारे लोकांची नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद टीमने (CERT-In)बनावट कोविन लस नोंदणी अ‍ॅपबद्दल लोकांना सतर्क करून नवीन एडवायजरी जाहीर केली आहे.

कोरोना काळात लोकांना आधीच बर्‍याच फसव्या लोकांचा सामना करावा लागतोय. पण भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद टीमने (CERT-In) बनावट कोविन लस नोंदणी करणाऱ्यांना इशारा दिलाय. 

फसवणूक करणारे तुम्हाला एसएमएसद्वारे 5 लिंकपैकी कोणत्याही लिंकवरील APK फाईल डाउनलोड करायला सांगतात. यामुळे तुमची गोपनीयता धोक्यात जाते.

एपीके अॅप अत्यंत धोकादायक असल्याचे सिद्ध होत आहे. हॅकर्सनी पाठविलेल्या एसएमएसवर विश्वास ठेवू नका. असे केल्यास, हे APK अॅप डेटा चोरुन स्वत: सर्वांना एसएमएस पाठवते. 

>> Covid-19.apk, >> 
Vaci__Regis.apk, >> 
MyVaccin_v2.apk, >> 
Cov-Regis.apk, >> 
Vccin-Apply.apk 

या फसव्या APK लिंक्स असून चुकूनही डाऊनलोड करु नका. 

भारत सरकारच्या वतीने लसीकरणाच्या प्रक्रियेचे डिजीटल व्यवस्थापन केले जात आहे. यासह, मागील वर्षापासून कार्यरत असणारी आरोग्य सेतू अ‍ॅप वेबसाइटवर किंवा कोविन (cowin.gov.in) वर नोंदणी करण्याचा सल्ला दिला जात आहे. इतरही कोणत्याही एप्सवर विश्वास ठेवू नका अशी सूचना दिली जातेय.