फ्लिपकार्टवर ४ सप्टेंबरपासून धमाकेदार सेल, घ्या डिस्काऊंटचा लाभ

 ४ सप्टेंबरला १२ वाजल्यापासून फ्लिपकार्टवर विक्री सुरू 

Updated: Sep 3, 2018, 01:52 PM IST
फ्लिपकार्टवर ४ सप्टेंबरपासून धमाकेदार सेल, घ्या डिस्काऊंटचा लाभ
मुंबई : भारतीय मार्केटमध्ये Realme२ स्मार्टफोन लॉन्च झालायं याची किंमत खूप स्पेशल असल्याने मोबाईलची चांगलीच चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी Realme ने ओप्पोचे सर्व ब्रॅण्ड मार्केटमध्ये आणले होते त्यानंतर Realme ही वेगळी कंपनी बनवली आहे. ओप्पो ही Realme ची पॅरेंट्स कंपनी आहे. Realme २ नवा स्मार्टफोन Realme १ चे अपग्रेड वर्जन आहे. या स्मार्टफोनची ४ सप्टेंबरला १२ वाजल्यापासून फ्लिपकार्टवर विक्री सुरू होणार आहे.

स्पेशल डिस्काऊंट 

 एचडीएफसी बॅंक डेबिट/क्रेडिट कार्ड यूजर्सना हा फोन ७५० रुपयांच्या डिस्काऊंटवर मिळणार आहे. म्हणजेच त्यांना हा फोन ८ हजार २४० रुपयांमध्ये मिळणार आहे. एक्स्चेंज ऑफरनुसार फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला पाचशे रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे. रिलायन्स जियो ग्राहक १२० जीबी आणि ४ जी डाटा व्यतिरिक्त ४२०० रुपयांचा कॅशबॅकचा लाभही मिळणार आहे.

मुख्य फिचर्स 

Realme २ च्या मुख्य फिचर्सबद्दल बोलायचं तर यामध्ये फेस अनलॉक, ४ हजार २३० एमएच बॅटरी, ड्युअल ४ जी बी ओएलटीई आणि ४ जीबी रॅम आहे. Realme १ मध्ये ६ जीबी रॅम वाला स्मार्टफोन पण आहे. याशिवाय स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसरही आहे. या फोनमध्ये बॅक फिंगरप्रिंट सेंसर आहे जो Realme  १ मध्ये नाहीए. किंमतीच्या बाबतीत या फोनची स्पर्धा शाओमी रेडमी ५ आणि नोकीया ३.१ अशा हॅंडसेटसोबत होईल.