Flipkart Big Saving Days : सॅमसंगच्या स्मार्टफोन्सवर २० हजारांपर्यंत सूट

आज रात्री म्हणजेच २२ जून रोजी रात्री ८ वाजेपासून सुरु होणार आहे.  

Updated: Jun 22, 2020, 06:39 PM IST
Flipkart Big Saving Days : सॅमसंगच्या स्मार्टफोन्सवर २० हजारांपर्यंत सूट

नवी दिल्ली : आजच्या काळात तरूणाईला नवनवीन स्मार्टफोन वापरण्याबद्दल फार उत्सुकता असते. जर तुम्ही देखील नवीन फोन घेण्याच्या विचारात आहेत. तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. फ्लिपकार्टवर २३ ते २७ जून दरम्यान Big Savings Days सेल आयोजित करण्यात आला आहे या सेलमध्ये अनेक प्रकारच्या मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स आणल्या आहेत. Flipkart Big Saving Days सेल आज रात्री म्हणजेच २२ जून रोजी रात्री ८ वाजेपासून सुरु होणार आहे.

Flipkart Big Saving Days ग्राहकांना घर बसल्या आणि किंमतीत वस्तू विकत घेता येणार आहेत. शिवाय एचडीएफीसी बँक कार्ड्स आणि ईएमआय ट्रान्झॅक्शनवर १० टक्के तात्काळ डिस्काउंट दिला जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे सॅमसंगच्या स्मार्टफोन्सवर २० हजारांपर्यंत सूट दिली जाणार आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी A80
सॅमसंग गॅलेक्सी A80 स्मार्टफोनची किंमत ४१ हजार ९९९ एवढी आहे. सेलच्या माध्यमातून ग्राहकांना हा फोन २१ हजार ९९९ रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा लेन्स आणि एक टाइम ऑफ फ्लाईट डेप्थ सेन्सर दिला आहे. इतर फोनवर देखील ऑफर देण्यात आल्या आहेत. 

त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड आणि ईएमआय वरून कमीतकमी ४ हजार ९९९ रूपयांची खरेदी केल्यास १ हजार ५०० रूपयांपर्यत सूट मिळणार असून डेबिट कार्डवरून खरेदी केल्यास  ५०० रुपयांपर्यंत  डिस्काउंट मिळणार आहे. सुपर सेव्हिंग ऑफर्स अंतर्गत मोबाइल आणि टॅबलेट वर जबरदस्त ऑफर्स दिले जात आहे.