Flipkart वर बंपर डिस्काऊंट, फार स्वस्तात मिळतोय Nothing Phone 1; 50MP कॅमेऱ्यासह जबरदस्त फिचर्स

Flipkart Sale: तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर स्वस्तात Nothing Phone 1 घेण्याची ही संधी आहे. Flipkart वर बंपर डिस्काऊंट सुरु असून कमी पैसे मोजत हा फोन विकत घेऊ शकता.   

Updated: Feb 11, 2023, 04:57 PM IST
Flipkart वर बंपर डिस्काऊंट, फार स्वस्तात मिळतोय Nothing Phone 1; 50MP कॅमेऱ्यासह जबरदस्त फिचर्स title=

Flipkart Sale: तुम्ही जर नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर स्वस्तात Nothing Phone 1 घेण्याची ही संधी आहे. Flipkart वर बंपर डिस्काऊंट सुरु असून कमी पैसे मोजत हा फोन विकत घेऊ शकता. Nothing Phone 1 हा गतवर्षी लाँच झाला होता. त्यावेळी या फोनची प्रचंड चर्चा झाली होती. कंपनीने iPhone ला स्पर्धा देण्याच्या हेतूने हा मोबाइल लाँच केला होता. हा फोन लोकांच्या पसंतीस पडला होता.

हा फोन घेण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर सध्या सुवर्णसंधी आहे. या फोनवर मोठी सूट मिळत आहे. Flipkart वर या मोबाइलवर मोठी सूट देण्यात आली आहे. 

किती किंमतीत मिळतोय फोन?

Nothing Phone 1 चा बेस व्हेरियंट 26 हजार 999 रुपयांत मिळत आहे. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास त्यावर 1000 रुपयांची सूट दिली जात आहे. हा बेस व्हेरियंट 8GB RAM + 128GB स्टोरेजसह उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन 30 हजाराच लॉन्च केला होता. 

हा स्मार्टफोन 6.55 इंचांच्या Full HD+OLED डिस्प्लेसह येतो. यामध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. हा हँडसेट Qualcomm Snapdragon 778G+ प्रोसेसरवर काम करतो. यामध्ये 128GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंतचा स्टोरेज पर्याय मिळतो. 

50MP ड्युअल रिअर कॅमेरा

या फोनमध्ये 50MP + 50MP डुअर रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. फ्रंटला कंपनीने 16MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. यामध्ये 4500mAh ची बॅटरी आहे. फास्ट चार्जिंग, वायरलेस चार्जिंग आणि इतर फिचर्स यामध्ये उपलब्ध आहेत. हा हँडसेट Glyph इंटरफेससह येतो. यामध्ये पांढरा आणि काळा असे दोन पर्याय उपलब्ध आहेत.