Hero Splendor चालवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता बाईक इलेक्ट्रिकसिटीवर धावणार

Hero Splendor​ News : भारतात जास्त मायलेज देणाऱ्या बाईकची चर्चा होते, त्यावेळी हिरो स्प्लेंडरचे  (Hero Splendor) नाव प्रथम घेतले जाते. 

Updated: Sep 7, 2021, 08:43 AM IST
Hero Splendor चालवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता बाईक इलेक्ट्रिकसिटीवर धावणार  title=

मुंबई : Hero Splendor News : भारतात जास्त मायलेज देणाऱ्या बाईकची चर्चा होते, त्यावेळी हिरो स्प्लेंडरचे  (Hero Splendor) नाव सर्वप्रथम घेतले जाते. या बाईकची किंमत आणि देखभाल खर्च (Maintenance Cost) इतका कमी आहे की तो सामान्यांच्या बजेटमध्ये असतो. पण गेल्या काही आठवड्यांपासून पेट्रोलची किंमत इतकी वाढली आहे की सामान्य माणूस गाडी चालवण्याआधीच अनेक वेळा विचार करत आहे. मात्र, आता काळजी करण्याचे कारण नाही. आज आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत.

विजेवर चालणार स्प्लेंडर बाईक 

हिरो स्प्लेंडर  Hero Splendor बाईक्ससाठी EV Conversion Kit बाजारात आणण्यात आली आहे. ज्यांना हिरो स्प्लेंडर खरेदी करायची आहे आणि पेट्रोलची बचत करायची आहे, त्यांच्यासाठी आता त्यांच्या आवडत्या बाईकमध्ये इलेक्ट्रिक ( electricity) किट बसवून पैसे वाचवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. या इलेक्ट्रिक किटच्या वापराला आरटीओने (RTO) मान्यताही दिली आहे. ठाणे, महाराष्ट्रातील EVG स्टार्टअप कंपनी GoGoA1 ने अलीकडेच लॉन्च केले आहे, ज्याची किंमत 35,000 रुपये आहे.

सिंगल चार्जवर किती मिळणार मायलेज ?

दरम्यान, मूळ रकमेसह, तुम्हाला 6300 रुपयांचा जीएसटी भरावा लागेल आणि तुम्हाला बॅटरीची किंमतही वेगळी भरावी लागेल. एकंदरीत, ईव्ही रूपांतरण किट आणि बॅटरीची किंमत 95,000 रुपये असेल. यानंतर, तुम्ही हिरो स्प्लेंडर कितीला खरेदी करता, ते वेगळे आहे. अशा परिस्थितीत, हिरो स्प्लेंडर इलेक्ट्रिकची किंमत इलेक्ट्रिक किटसह चांगली पडेल. पण हे एकवेळच्या गुंतवणुकीसारखे असेल. किटसह 3 वर्षांची वॉरंटी दिली जात आहे.  Rushlane यांच्या मते, GoGoA1 दावा करत आहे की ही बाईक सिंगल चार्जवर 151 किमीपर्यंत धावू शकते.

इलेक्ट्रिक वाहनांची बंपर विक्री

सध्या भारतातील लोकप्रिय कंपन्यांनी अशा इलेक्ट्रिक बाईक्स लॉन्च केलेल्या नाहीत. फॉसिल फ्यूल वेरियंट ज्यांची बंपर विक्री केली जात आहेत. अशा परिस्थितीत आता GoGoA1 कंपनीने लोकांसमोर एक पर्याय ठेवला आहे, जो खूप महाग आहे. येणाऱ्या काळात हिरो, बजाज आणि यामाहा, होंडासह अनेक दुचाकी कंपन्या इलेक्ट्रिक बाईक्स लॉन्च करतील. सध्या रिव्हॉल्ट इलेक्ट्रिक बाईक्ससह इतर छोट्या -मोठ्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरची बंपर विक्री भारतात केली जात आहे. काही काळापूर्वी, गोव्यातील एका स्टार्टअप कंपनीने जुन्या स्कूटरचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्याचा उपक्रमही सुरू केला आहे.