लवकरच बंद होणार गुगलची ही सेवा

गुगलकडून लवकरच त्यांचं सोशल नेटवर्क गुगल+ बंद करणार आहे.

Updated: Oct 9, 2018, 10:25 PM IST
लवकरच बंद होणार गुगलची ही सेवा

मुंबई : गुगलकडून लवकरच त्यांचं सोशल नेटवर्क गुगल+ बंद करणार आहे. सोमवारी कंपनीनं याची घोषणा केली आहे. गुगल+ च्या ५० हजार ग्राहकांचा वैयक्तिक डेटा बाहेर आल्याची माहिती समोर आली होती पण आम्ही हा बग आधीच दुरुस्त केल्याचं गुगलनं सांगितलं आहे. लवकरच गुगल+चा सूर्यास्त होणार असल्याचं गुगलनं स्पष्ट केलं.

फेसबूकला टक्कर देण्यासाठी गुगल+ बनवण्यात आलं होतं. पण गुगलची ही सेवा अपयशी ठरली. यूजर्सनी गुगल+कडे पाठ फिरवली. यामुळेच गुगल+ बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. गुगल+ बनवल्यापासून आम्हाला बरीच आव्हानं होती. ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणेच गुगल+ तयार करण्यात आलं होतं पण त्याचा वापर कमी होत होता, म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागल्याचं गुगलच्या प्रवक्त्यानं सांगितलं.