चीनी Shareit विरुद्ध Googleकडून नवं ऍप लॉन्च

फाईल ट्रान्सफर करण्यासाठी नवं ऍप...

Updated: Aug 11, 2020, 07:01 PM IST
चीनी Shareit विरुद्ध Googleकडून नवं ऍप लॉन्च title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : चीनी फाईल ट्रान्सफर ऍप शेअरइट  Shareit सरकारकडून बॅन करण्यात आल्यानंतर आता सर्च इंजिन कंपनी गूगलने Google आपलं एक ऍप लॉन्च केलं आहे. या ऍपला कंपनीने नियरबार शेअर Nearby Share असं नाव दिलं आहे. 

हे ऍप ऍपलच्या Apple AirDrop प्रमाणे आहे जे आयफोनमध्येही iPhone काम करतं. नियरबाय शेअरमध्ये ऍन्ड्राईड यूजर्सही सहजपणे जवळच्या फोनमध्ये ब्लूटूथद्वारे पिक्चर्स, फाईल, फोटो आणि लिक्स  शेअर करु शकतात.

गूगलने हे नवं फिचर ऍन्ड्राईड यूजर्सच्या गरजा लक्षात घेता बनवलं आहे, ज्याच्या मदतीने ऍन्ड्राईड यूजर्स एकमेकांच्या डिव्हाईसमध्ये डेटा सहजपणे ट्रान्सफर करु शकतात. यासाठी कमी वेळ लागणार आहे. हे नवं फिचर OS Android 6 आणि त्यानंतरच्या सर्व डिव्हाईसमध्ये देण्यात आलं आहे. 

Apple डिव्हाईसमध्ये एयरड्रॉपमुळे डाटा ट्रान्सफर करणं सहज शक्य आहे. AirDropच्या माध्यमातून डाटा ट्रान्सफर करणं सुरक्षितही आहे. सहसा याद्वारे डेटा चोरीचा धोका नसतो.