मुंबई : चीनी कंपनी हुआवेची सहाय्यक स्मार्टफोन मेकर Honor ने आपला फ्लॅगशीप Honor 10 लॉन्च केला आहे. हा एक प्रीमियम डिव्हाईस आहे आणि कंपनीने याच्यात iPhone X सारखा नॉच दिला आहे. याला दुसऱ्या कंपन्या देखील वेगाने अॅडॉप्ट करत आहेत. हे डिझाईन Huawei P20 शी मिळतं जुळतं आहे. या स्मार्टफोन लॉन्चची घोषणा चीनमधील एका कार्यक्रमात करण्यात आली. मात्र या फोनचं लॉन्चिंग लंडनमध्ये १५ मे रोजी करण्यात येईल.
Honor 10 मध्ये 5.84 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आली आहे. ज्यात एक्सपेक्ट रेशो हा 19:9 आहे. या स्मार्टफोनसोबत 6जीबी रॅम HiSilicon Kirin 970 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 64GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये 128GB इनबिल्ट मेमरी देण्यात आली आहे.
ग्लास डिझाईनवाल्या या स्मार्टफोनमध्ये AI 2.0 टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. यात फेस डिटेक्शन, गॅलरी मॅनेजमेंटचा युझर्सना फायदा होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार याच्यात 7.1 मल्टी चॅनेल आयफाय ऑडिओ चीप देखील देण्यात आली आहे. जी ७ चॅनल्सचा साऊंड इफेक्ट देतो.
फोटोग्राफीसाठी याच्यात रियर डुअल कॅमेरा सेटअप केला आहे. एक लेन्स १६ मेगापिक्सलची आहे, तर दुसरा कॅमेरा २४ मेगापिक्सलचा आहे, डुअल एलईडी फ्लॅश देखील आहे आणि कॅमेरा अपर्चर f/1.6 आहे. सेल्फीसाठी यात २४ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला. यात AI कॅमरा देण्यात आला आहे.
Honor 10 मध्ये 3400mAh ची बॅटरी देण्यात आली. यात क्वीक रिचार्ज सपोर्ट मिळतो. कंपनी ने दावा केला आहे की, यासोबत देण्यात आलेल्या चार्जरसोबत तुम्ही स्मार्टफोन २ मिनिटात, ५० टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकता. कनेक्टीव्हीटी सोबत देण्यात आलेल्या चार्जरसोबत, तुम्ही स्मार्टफोन २५ ते ५० टक्के चार्ज करू शकता. कनेक्टीव्हीला याच्यासाठी 4G LTE सह वायफाय, ब्लूटूथ आणि दूसरे स्टॅण्डर्ड फीचर्स देण्यात आले आहेत. यात तुम्हाला यूएसबी टाईप सी पोर्ट आणि हेडफोन जॅक देखील मिळतो.
चीनमध्ये Honor 10 ची विक्री 27 एप्रिल रोजी सुरू होईल. 6GB+64GB वेरिएंटची किंमत 22, हजार रूपये आहे. तर 6GB+128GB वेरिएंटची किंमत ३१ हजार रूपये आहे. अमेरिकेत आणि भारतात, सध्या या किंमतींची घोषणा झालेली नाही.