Recall send email in Gmail: एखाद्याचा ईमेल आयडी घेताना शब्द किंवा आकड्याची चूक झाली, की समजा चुकीच्या व्यक्तीकडे, त्याच्या मेल आयडीवर हा मेल गेलाच. सहसा Office Hours मध्ये अशी एखादी चूक झाली, किंवा काही महत्त्वाच्या कागदपत्रांचा मेल चुकीच्या मेल आयडीवर केला गेला तर मात्र गोंधळच उडून जातो. पण, या चुका नेमक्या का होतात माहितीये? यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे ड्रॉपडाऊनमधून चुकीचा इमेल आयडी निवडणं किंवा टाईप करताना एखादा शब्द चुकवणं. (how to Recall send email in Gmail read details)
तुमच्याकडूनही अशीच एखादी चूक झाली असेल, तर घाबरून जाण्याची गरज नाही. कारण, जीमेलकडे तुमच्या या चुकीला रिकॉल करण्याची तरतुद आहे. पण, त्यासाठी हा पर्याय Active केला जाणं गरजेचं. पर्याय अॅक्टिव्ह झाल्यानंतर तुम्ही सेंड मेलला 30 सेकंदांमध्ये रिकॉल करु शकता. त्यापुढच्या सेकंदाला ही सुविधा उपलब्ध नसेल.
जेव्हाजेव्हा जीमेलवरून मेल पाठवला जातो, तेव्हातेव्हा तुमच्या स्क्रीनवर डाव्या बाजूला खाली Undo आणि View message हा पर्याय दिसतो. तुमच्याकडून एखादी चूक झाल्यास Undo या पर्यायावर क्लिक करा. असं करताच सेंड केलेला मेल तुम्ही पुन्हा मेलबॉक्समध्ये घेऊ शकता. तुम्ही हा मेल Cancel सुद्धा करु शकता. यानंतर अपेक्षित बदल करत तुम्ही हाच ईमेल अपेक्षित मेल आयडीवर पाठवू शकता.
बहुतांश मेल आयडींमध्ये हा पर्याय Active असतो. तुमच्याकडे हा पर्याय अॅक्टिव्ह नसल्यास तो अगदी सहजपणे सुरु करता येऊ शकतो. त्यामुळे चिंतेची बाब नाही. हा पर्याय Active करण्याची पद्धत...
- सर्वप्रथम जीमेल सुरु करा.
- जीमेलमध्ये सेटिंग्स हा पर्याय निवडा.
- See all settings वर क्लिक करा.
- जनरल सेटिंग्समध्ये "Undo Send" पर्याय दिसेल.
- इथे तुम्हाला कॅन्सलेशन पिरियड दिसेल, जिथून 5,10,20,30 सेकंदांपैकी एक पर्याय निवडा. त्याच पेजच्या सर्वात खाली 'Save changes' नावाचा आणखी एक Option असेल आणि तिथेच क्लिक केलं असता Undo चा पर्याय Active झालेला असेल.