स्वातंत्र्यदिन ऑफर: पाहा कोठून वस्तू घेणे तुम्हाला ठरेल फायदेशीर

१५ ऑगस्टच्या निमित्ताने क्रोमा, विजय सेल्स आणि रिलायन्स डिजिटलने वेगवेळ्या डिस्काऊंट ऑफर आणल्या आहेत. पण कुठून वस्तू घेणं तुम्हाला स्वस्त आणि फायदेशीर ठरु शकतं हे तुम्हाला सांगणार आहोत.

Updated: Aug 15, 2017, 01:03 PM IST
स्वातंत्र्यदिन ऑफर: पाहा कोठून वस्तू घेणे तुम्हाला ठरेल फायदेशीर  title=

मुंबई : १५ ऑगस्टच्या निमित्ताने क्रोमा, विजय सेल्स आणि रिलायन्स डिजिटलने वेगवेळ्या डिस्काऊंट ऑफर आणल्या आहेत. पण कुठून वस्तू घेणं तुम्हाला स्वस्त आणि फायदेशीर ठरु शकतं हे तुम्हाला सांगणार आहोत.

क्रोमा - क्रोमाने इलेक्ट्रिकल वस्तूंच्या खरेदीवर १५ टक्के ऑफ ठेवलं आहे. म्हणजे तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी केली तर त्यावर तुम्हाला १५ टक्के कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. कार्ड पेमेंट केल्यानंतर ती ९० दिवसानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत तुम्हाला क्रोमामधून वस्तू विकत घेणे फायदेशीर ठरेल.

रिलायन्स डिजिटल - रिलायन्स डिजिटलने देखील १५ टक्के ऑफ ऑफर आणली आहे. पण यामध्ये तुम्हाला १० टक्के कॅशबॅक ९० दिवसानंतर तुमच्या अकाऊंटमध्ये मिळणार आहे आणि ५ टक्के तुम्हाला वाऊचरमध्ये मिळणार आहे. जे तुम्हाला इतर वस्तू खरेदी करण्यासाठी वापरता येईल. याची वैधता ३१ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

विजय सेल्स - विजय सेल्सने देखील स्वांतत्र्य दिनाच्या निमित्ताने ऑफर आणली आहे. वेगवेगळ्या वस्तूंवर ही वेगवेगळी ऑफर देण्यात आली आहे. टीव्ही, फ्रिज, एसी यावर वेगवेगळे ऑफर देण्यात आले. एक्सचेंज ऑफर देखील यामध्ये देण्यात आली आहे.