जिओची जीएसटी ऑफर, १ वर्ष कॉलिंग आणि डेटा फ्री

जर तुम्हाला याआधी रिलायन्स जिओचा लाभ नसेल घेता आला तर निराश होऊ नका. कारण जीएसटी लागू झाल्यानंतर जिओने स्टार्टर किट ऑफर लाँच केली आहे.

Updated: Jul 4, 2017, 12:04 PM IST
जिओची जीएसटी ऑफर, १ वर्ष कॉलिंग आणि डेटा फ्री title=

मुंबई : जर तुम्हाला याआधी रिलायन्स जिओचा लाभ नसेल घेता आला तर निराश होऊ नका. कारण जीएसटी लागू झाल्यानंतर जिओने स्टार्टर किट ऑफर लाँच केली आहे. तुम्ही या जीएसटी ऑफरचा लाभ घेऊ शकता. ही नवीन ऑफर २ जुलैपासून लागू झाली आहे. जीएसटीच्या नवीन कर प्रणालीनुसार ही ऑफर आणली आहे.

हे एक सॉफ्टवेअर आहे जे 1,999 रुपयांमध्ये उपलब्ध असलेलं पहिलं मोबाईल सोल्यूशन आहे. देशातील छोट्या विक्रेत्यांना जीएसटी स्वीकार करण्यास मदत होईल. सॉफ्टवेअरसह जिओफाय उपकरणही मिळेल. इतकाच नाही तर तुम्हाला त्याच्या अंतर्गत अनलिमिटेड वॉईस कॉलिंग आणि डेटा देखील मिळणार आहे.

- रिलायन्स जिओ भारताच्या जीएसटी फीचर प्रोव्हाईडरमधली एक कंपनी आहे.

- जीएसपी (जीएसटी सेवा प्रदाता) टॅक्सपेयरसाठी हे सॉफ्टवेअर आणलं आहे.

- जीएसटी रिटेलर्सना रेकॉर्ड योग्यरित्या मॅनेज करणे, जीएसटी रिटर्न फाईलिंग आणि जीएसटीचे नियम फॉलो करण्यासाठी मदत करेल.

- जिओ जीएसटी हे स्टार्टर किट आहे. यामध्ये जीएसटी फाईलिंग सेवा, जिओफाई उपकरण, अमर्यादित वॉईस कॉलिंग, डेटा, जिओ बिलिंग अॅप्लिकेशन आणि जीएसटी नॉलेज सीरीज आहे.

याची एकूण मार्केट किंमत 10,884 रुपये आहे, पण जिओ 1,999 रुपयांमध्ये हा पॅकेज देत आहे.

जिओ जीएसटी पॅकेजमध्ये मिळेल ही सुविधा .

1. 1 वर्षे अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणइ 24GB डेटा

2. 1 वर्षासाठी जीएसटी सॉफ्टवेअर सोल्यूशन

3. जिओफाई डिवाईस

4. बिलिंग अॅप आणि बरेच काही