जियोचा नवा फोन ५०१ नाही तर १०९४ रुपयांत,जाणून घ्या अटी

फोनच्या बदल्यात घेतले गेलेले ५०१ रुपये ३ वर्षांनतर ग्राहकांना परत दिले जाणार

Updated: Jul 22, 2018, 01:54 PM IST
जियोचा नवा फोन ५०१ नाही तर १०९४ रुपयांत,जाणून घ्या अटी  title=

नवी दिल्ली : रिलायन्स जियोच्या मान्सून ऑफरनुसार ग्राहकांना ५०१ रुपयांमध्ये जुन्या फोनच्या बदल्यात नवा फोन मिळणार असल्याची चर्चा होती. पण आता हा फोन मिळविण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांना १,०९५ रुपये खर्च करावे लागणार आहेत. या फोनसोबत ग्राहकांना ५९४ रुपयांचा सहा महिन्यांसाठी रिचार्जदेखील करावा लागणार असल्याचे कंपनीच्या नियम आणि अटींमध्ये म्हटलं गेलंय. असं असल तरीही फोनच्या बदल्यात घेतले गेलेले ५०१ रुपये ३ वर्षांनतर ग्राहकांना परत दिले जाणार आहेत. मान्सून ऑफर नुसार हा फोन ५०१ रुपयांत मिळेल आणि १०० टक्के ही रक्कम परत मिळेल असेही कंपनीच्या एका नोटमध्ये म्हटले आहे. यानुसार जियो फोन फ्री होऊन जातो. ही रक्कम नियम आणि अटींनुसार परत केली जाणार आहे.

५० टक्के रक्कम वाचणार 

सद्यस्थितीतील फीचर फोन, बॅटरी तसेच चार्जरसोबत आणणाऱ्या ग्राहकांना या संधीचा लाभ मिळणार आहे. काही वापरकर्त्यांना कमी डेटाची गरज असते त्यांना कमी दरातील फोन उपलब्ध करुन देणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आलंय. यासाठी ९९ रुपयांमध्ये २८ दिवसांसाठी फ्री वॉईस कॉल, प्रति दिन ०.५ जीबी डेटा आणि ३०० एसएमएस दिले जाणार आहेत. यामुळे ग्राहकांचा खर्च ५० टक्के कमी होणार आहे.

फिचर्स 

ड्युअल सिम
२.४ इंच QVGA डिस्‍प्ले
Kai ऑपरेटिंग सिस्‍टिम 
५१२ MB रॅम
४GB इंटरनल स्‍टोरेज, 128GB पर्यंत वाढणार
२००० mAHबॅटरी
२ मेगापिक्‍सल रेयर कॅमरा आणि VGA फ्रंट फेसिंग कॅमरा 
FM, ब्‍लूटूथ, GPS, Wi-Fi, NFC सपोर्ट 
फेसबुक, यूट्यूब, व्‍हाट्सअॅप

जुन्या फोनपेक्षा काय वेगळं ? 

सध्याच्या जिओ फोनमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप वापरता येत नाही. पण नव्या फोनमध्ये ही सुविधा असेल. जुना फोन अपग्रेड होणार असल्याचे डायरेक्टर ईशा अंबानीने घोषणा केली. वॉईस कमांड देऊन व्हिडिओ प्ले करता येणार आहे. १५ ऑगस्टपासून हे सारे फिचर्स उपलब्ध होतील.

कसा मिळेल हा फोन ? 

जर तुम्हाला हा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर वेबसाइटवर जाऊन स्वत:ची नोंदणी करावी लागेल. आपला फोन नंबर, पत्ता अशी माहिती तुम्हाला द्यावी लागेल. कंपनीतर्फे ईमेल किंवा मेसेज करून तुम्हाला कन्फर्मेशन दिले जाणार आहे. बुकिंग संदर्भातील महत्त्वाची माहितीदेखील मेल किंवा मेसेजद्वारे मिळणार आहे.