close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

VIRAL VIDEO : ...म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होतोय या टाळ्याचा व्हि़डिओ

सध्या सोशल मीडियावर एका स्मार्ट टाळ्याचा व्हिडिओ लोकांना आकर्षित करून घेतोय

Updated: Aug 21, 2019, 02:08 PM IST
VIRAL VIDEO : ...म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होतोय या टाळ्याचा व्हि़डिओ

नवी दिल्ली : आजकाल सोशल मीडिया मोबाईलच्या साहाय्यानं जवळपास प्रत्येकाच्या हातात पोहचलाय. भारतात टिकटॉकची क्रेझ इतकी वाढलीय की दिवसाला हजारोंनी नवीन व्हिडिओ याद्वारे सोशल मीडियावर दाखल होत आहेत. अर्थातच, यावर तुम्ही आत्तापर्यंत अनेक प्रकारचे व्हिडिओ पाहिले असतील. कधी कुणाचा व्हायरल डान्स तर कधी एखाद्या उभरत्या कलावंताची कला व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झालेली तुम्ही पाहिली असेल... पण आता मात्र सोशल मीडियावर एका टाळ्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 

सध्या सोशल मीडियावर एका स्मार्ट टाळ्याचा व्हिडिओ लोकांना आकर्षित करून घेतोय. या व्हिडिओमध्ये एक मोठ्या आकाराचं टाळं दिसतंय. या टाळ्याची चावाही वापरकर्त्याच्या हातात आहे. परंतु, ही चावी लावण्यासाठी कोणताही ऑप्शन टाळ्यावर दिसत नाही. मग टाळं उघडणार कसं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्हालाही हा व्हिडिओ पाहावा लागेल... 

या टाळ्याचं सोशल मीडिया युझर्सकडून कौतुक होतंय. कुणी हे टाळं युनिक असल्याचं म्हटलंय तर कुणी हे टाळं स्मार्ट असल्याचं सांगत आहेत.