Mr. Bean च्या गाडीसारखी Electric Car लाँच! एका चार्जमध्ये कापणार 240 किमी

E.Go electric car: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि भविष्याचा विचार करता ऑटो कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक कारकडे वळवला आहे. गेल्या काही महिन्यात एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आल्या आहे. आता जर्मनीच्या इलेक्ट्रिक व्हेईकल ब्रँड e.go नं 2022 पॅरिस मोटर शोमध्ये आपली मायक्रो इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. या मायक्रो गाडीला e.wave x असं नाव देण्यात आलं आहे.

Updated: Oct 19, 2022, 04:13 PM IST
Mr. Bean च्या गाडीसारखी Electric Car लाँच! एका चार्जमध्ये कापणार 240 किमी title=

E.Go electric car: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि भविष्याचा विचार करता ऑटो कंपन्यांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक कारकडे वळवला आहे. गेल्या काही महिन्यात एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आल्या आहे. आता जर्मनीच्या इलेक्ट्रिक व्हेईकल ब्रँड e.go नं 2022 पॅरिस मोटर शोमध्ये आपली मायक्रो इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. या मायक्रो गाडीला e.wave x असं नाव देण्यात आलं आहे. ही गाडी जवळपास Mr. Bean च्या गाडीसारखीच दिसते. ही गाडी मारुति अल्टो 800 पेक्षाही छोटी आहे. या गाडीची लांबी 3.41 मीटर आहे. मायक्रो ईव्हीमध्ये 3 दरवाजे आणि 4 सीट आहेत. या गाडीमध्ये 86 kW बॅटरी दिली असून 110bhp पॉवर जनरेट करते. सिंगल इलेक्ट्रिक मोटर 107 Bhp जनरेट करते.  ही गाडी पूर्ण चार्जवर 240 किमी अंतर कापते. 

e.wave X ला डिझाइन डॅशबोर्ड, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि डिजिटल इन्फोटेनमेंट टचस्क्रीन मिळते. डिस्प्लेसाठी बटणे खाली दिली आहेत. इलेक्ट्रिक कारला लेदर अपहोल्स्ट्री, अॅल्युमिनियम-स्टाईल प्लास्टिक ट्रिम आणि सेंटर कन्सोलवर वायरलेस चार्जिंग पॅड मिळतात. यात इको, कम्फर्ट आणि स्पोर्ट असे तीन ड्राइव्ह मोड आहेत. गाडीमध्ये राउंड शेप हेडलँप्स, एलईडी डीआरएल, रॅली-स्टाईल लाईट आणि सिल्वर बंपर दिलं आहे. साईडला रुंद फेंडर फ्लेयर्स, 18 इंच व्हील्स आणि सिंगल डोअर दिला आहे. 

ही चार सीटर गाडी रिअर व्हील ड्राइव्ह फीचर्ससह येते. या मायक्रो ईव्हीची किंमत 24,990 युरो (20 लाख रुपये) पासून सुरू होते. लवकरच ही जागतिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. वाहतूक कोंडीत ही गाडी चांगला पर्याय ठरू शकते.