अंध व्यक्तींना नोट ओळखण्यास मदत करणार 'आरबीआय'चं हे ऍप...

हे मोबाईल ऍप गूगल प्ले स्टोअरवर अगदी मोफत उपलब्ध आहे

Updated: Jan 2, 2020, 06:04 PM IST
अंध व्यक्तींना नोट ओळखण्यास मदत करणार 'आरबीआय'चं हे ऍप... title=

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) दृष्टिबाधित (Visual Impaired) व्यक्तींसाठी एक मोबाईल ऍप लॉन्च केलंय. या ऍपचा फायदा तुम्हालाही होऊ शकतो. हे ऍप तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर इंटरनेटशिवायही ते काम करू शकेल. केवळ नोट स्कॅन करून हे ऍप ती नोट किती रुपयांची आहे? हे ओळखण्यास मदत करेल. या ऍपचं नाव आहे MANI अर्थात  Mobile Aided Note Identifier

हे मोबाईल ऍप गूगल प्ले स्टोअरवर अगदी मोफत उपलब्ध आहे. महात्मा गांधी सीरीजच्या नोटांची ओळख पटवू शकेल... आणि आवाजाच्या सहाय्यानं तुम्हाला ते सांगूही शकेल. नेव्हिगेशनसाठी ऑडिओ सेन्सर काम करतात. अर्थात आवाजानं हे ऍप काम करू शकतं. 

नोटेला घडी पडलेली किंवा दुमडलेली असेल तरीही हे ऍप त्याची ओळख पटवू शकेल. अर्थात प्रत्येक नोटेची ओळख हे ऍप पटवू शकेल. 

इंटॅग्लियो प्रिन्टिंग, टॅक्सटाईल मार्क, साइज, नंबर, रंग, मोनोक्रोमेटिक पॅटर्ननं नोटेची ओळख पटवता येते. MANI ऍप या सर्वांची पडताळणी करून तुम्हाला ती नोट किती रुपयांची आहे, हे सांगू शकेल.

या ऍपची सुरूवात RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली. या ऍपचा फायदा कलर ब्लाईंड, पार्शिअली साइटेड, कम्प्लीट ब्लाईंड व्यक्तींना सर्वाधिक होऊ शकेल. देशात जवळपास ४० मिलियन लोक दृष्टिबाधित आहेत. त्यातील ७ मिलियन कम्प्लीट ब्लाईंड गटात येतात. त्यांना नोटेची खात्री पटवणं कठीण होतं. अशाच व्यक्तींची मदत करण्याच्या दृष्टीने आरबीआयनं हे पाऊल उचललंय.    

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x