रिचार्ज करा आणि मिळवा 10 लाख रुपये..आज आहे शेवटची संधी..या कंपनीची मोठी ऑफर

यामध्ये सहभागी होऊन, तुम्ही  दररोज 10 लाखांपर्यंत Reward जिंकू शकतात.

Updated: Sep 11, 2022, 03:16 PM IST
रिचार्ज करा आणि मिळवा 10 लाख रुपये..आज आहे शेवटची संधी..या कंपनीची मोठी ऑफर  title=

jio recharge plan: Jio टेलिकॉम कंपनीला भारतात ६ वर्ष पूर्ण होत आहेत.(jio completed 6 years in india) आणि त्याच आनंदाच्या भरात जियोने आपल्या ग्राहकांना खूप ऑफर्स दिल्या(Jio Offers) आहेत .

या ऑफर्स मुळे जियो ग्राहकांची चांगलीच चांदी होणार आहे . कधीही दिली नाही अशी मोठी ऑफर जियो आपल्या ग्राहकांना देत आहे .जर तुम्हीसुद्धा जियो वापरकर्ते असाल तर तुम्हीसुद्धा या ऑफर चा लाभ घेऊ शकता. 

या ऑफर चा लाभ घेण्यासाठी युझरला 299 रुपये किंवा त्याहून अधिकचे रिचार्ज करावे लागेल मग तुम्ही  रिचार्ज ब्लास्टमध्ये सहभागी होऊ शकता, यामध्ये सहभागी होऊन, तुम्ही  दररोज 10 लाखांपर्यंत रिवॉर्ड जिंकू शकतात.

 Jio वापरकर्त्यांना 10 लाख जिंकण्याची संधी:

जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल,  मुख्य म्हणजे आज त्याचा शेवटचा दिवस आहे. मुख्य म्हणजे  ही ऑफर तामिळनाडूमधील युझर्ससाठी  उपलब्ध नाही.

ही  ऑफर आत्ता प्रीपेड वापरकर्त्यांसाठी आहे . हे रिवॉर्ड्स (jio rewards)वापरकर्त्यांना रोज दिले जातील .त्यामुळे रिचार्ज करा आणि करोडपती व्हा अशीच ही अफलातून ऑफर आहे .