जिओ, एअरटेल, आयडिया, वोडाफोनवर लाखोंचा दंड

या कंपन्यांवर का लावला इतका दंड

Updated: Jul 2, 2018, 11:21 AM IST
जिओ, एअरटेल, आयडिया, वोडाफोनवर लाखोंचा दंड title=

मुंबई : देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या Reliance Jio, Bharti Airtel, Vodafone आणि Idea Cellular यांच्यावर दूरसंचार नियमन TRAI ने दंड ठोठावला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार TRAI ने हे पाऊल डिसेंबरपासून 3 महिने चांगली सेवा न पुरवल्याने दंड ठोठावला आहे. Reliance Jio वर जवळपास 31 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड कॉल सेंटर आणि ग्राहक सेवा व्यवस्थित न पोहोचवल्य़ामुळे ठोठावण्यात आला आहे. Reliance Jio कडून मात्र अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सोबतच Bharti Airtel वर देखील 23 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. Idea Cellular वर 28-29 लाख रुपयांचा तर  Vodafone वर 9 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

Idea Cellular, Vodafone आणि Bharti Airtel ने देखील याबाबत पाठवण्यात आलेल्या इमेलवर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. इतर कंपन्यांवर देखील दंड ठोठावण्यात आला आहे. ज्याममध्ये Aircel आणि BSNL चा देखील समावेश आहे. TRAI ने लावलेला दंड हा कंपन्यांच्या विविध सर्कल आणि सेवा क्षेत्रांशी जोडलेला आहे. TRAI चेअरमन आर.एस शर्मा यांनी नुकताच याबाबत पुष्टी केली आहे की, दूरसंचार ऑपरेटर कंपन्यांवर डिसेंबरपासून 3 महिन्यांच्या सेवेवर आर्थिक कारवाई केली आहे.