रेडमी Note 5 चे फीचर्स झाले लीक

शिओमीच्या फोन्सने स्मार्टफोनच्या जगात धुमाकूळ घातला आहे.

Updated: Jan 9, 2018, 09:16 AM IST
रेडमी Note 5  चे फीचर्स झाले लीक  title=

 मुंबई  : शिओमीच्या फोन्सने स्मार्टफोनच्या जगात धुमाकूळ घातला आहे.

ई कॉमर्सवर या कंपनीचे फोन सर्वाधिक पसंत केले जातात. अवघ्या काही  मिनिटामध्ये या फोन्सची झटपट विक्री झाली  होती. आता शिओमी रेडमी नोट ५ लवकरच बाजारात येणार आहे.  
  रेडमी  नोट ५ च्या टेस्टिंगदरम्यान काही फीचर्स लीक झाली आहेत. स्मार्टफोनमध्ये क्लॉलकॉमचा स्नॅपड्रेगन ६३२ प्रोसेसर देण्यात आला आहे. 

  प्रोसेसरमुळे लॉन्च  होणार उशिरा  

 मीडिया रिपोर्ट्सनुसारे रेडमी नोट 5 लॉन्च होण्यास उशिर झाला आहे. यामागील कारण म्हणजे कंपनीला क्लॉलकॉमचा स्नॅपड्रेगन ६३२ प्रोसेसरच्या अनाऊसमेंटची प्रतिक्षा आहे. या फोनची किंमत नोट ४ पेक्षा अधिक असणार आहे.  बेस व्हॅरिएंट सुमारे १५,५९९ रूपयांपासून सुरू होणार आहेत.   

 २ व्हेरिएंटमध्ये होणार उपलब्ध  

 रिपोर्ट्सनुसार, रेडमी नोट 5 या फोनचे २ व्हेरिएंट बाजारात उपलब्ध होणार  आहेत. त्यापैकी एक ३ जीबी रॅमसोबत ३२ जीबी इंटरनल मेमरी दिली जाणार आहे. तर दुसर्‍या व्हेरिएंटमध्ये ४ जीबी रॅमचा  ६४ जीबी इंटरनल मेमरी मोबाईल उपलब्ध होण्याची शक्यता आहे.   

 फोनची फीचर्स काय ? 

 रेडमी नोट ५ मध्ये ५.९९ इंच फूल एचडी (1080×2160 पिक्सल)  डिस्प्ले असणार आहे. 
 
 डिस्प्ले फूल व्हिजन असेल. 
 
 ड्युएल रिअर कॅमेरा, फ्रंट कॅमेरा ५ मेगा पिक्सल असेल
 
 फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी असेल 
 
 फोनमध्ये अ‍ॅन्ड्रॉईड ७.१ नोगट असेल.