२८ फेब्रुवारीला लाँन्च होणार 'रेडमी नोट ७'

'रेडमी नोट ७'स्मार्टफोनला ४८ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

Updated: Feb 14, 2019, 05:05 PM IST
२८ फेब्रुवारीला लाँन्च होणार 'रेडमी नोट ७'  title=

मुंबई : नवीन मोबाईल घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. भारतीय बाजारात 'रेडमी नोट ७' येण्याच्या तयारीत आहे. ४८ मेगापिक्सल कॅमेरा असणारा 'रेडमी नोट ७' येत्या २८ फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारात लाँन्च होणार आहे. चीनमध्ये जानेवारी महिन्यात 'रेडमी नोट ७' लाँन्च करण्यात आला होता. चीनमध्ये ३ जीबी रॅम असणाऱ्या 'रेडमी नोट ७'ची किंमत १०,३९० रूपये तर ४ जीबी रॅम १२,६४० रूपयांना लाँच झाला होता. ६ जीबी रॅम असणारा 'रेडमी नोट ७'ची किंमत १४,५४० इतकी होती. भारतातील 'रेडमी नोट ७'च्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. परंतु भारतात 'रेडमी नोट ७'ची किंमत साधारण चीनप्रमाणेच १० हजार रूपयांपासून सुरू होऊ शकते. भारतीय बाजारात 'रेडमी नोट ७' लाल, काळा आणि निळ्या रंगात उपलब्ध होणार आहे. 

काय आहेत 'रेडमी नोट ७'ची वैशिष्ट्ये -

- ६.३ इंची फुल HD+ डिस्प्ले
- कॉर्निंग गोरिला ग्लास ५ प्रोट्क्शन
- क्व़ॉलकॉम, ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ६६० प्रोसेसर
- 'रेडमी नोट ७' ३ जीबी, ४ जीबी, ६ जीबी रॅममध्ये उपलब्ध
- ३२ आणि ६४ जीबी स्टोरेज 
- ४८ आणि ५ मेगापिक्सल रियर ड्युअल कॅमेरा सेटअप
- १३ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- ४००० mAh बॅटरी बॅकअप
- ३.३ mm ऑडिओ जॅक देण्यात आला आहे.