Pizza ऑर्डर करताय का? मग ही बातमी तुमच्यासाठी!

एखादा पदार्थ खावासा वाटला की, पटकन मोबाईलमधील अॅपद्वारे तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता आणि काही वेळातच तो पदार्थ तुम्ही सांगाल तिकडे डिलिव्हरी बॉयमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतो. आता या प्रक्रियेत तंत्रज्ञानाच्या मदतीने वैशिष्ट्यपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. 

Updated: Oct 7, 2022, 01:12 PM IST
Pizza ऑर्डर करताय का? मग ही बातमी तुमच्यासाठी! title=

Serve Robotics : सध्याच युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. इंटरनेट (internet) आपल्या आयुष्यात अनेत महत्वपूर्ण बदल केले आहेत. आता आपल्याला घरी बसून ऑनलाईन वस्तु तसेच जेवनही घरी मागवता येते. आता ऑनलाईन ऑर्डर (online order) केलेले खाद्यपदार्थ घरी डिलिव्हरी करण्यासाठी रोबोट येणार आहेत. आता या प्रक्रियेत तंत्रज्ञानाच्या मदतीने वैशिष्ट्यपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. (robot will deliver your pizza in future pizza hut)

तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित झाली असून कॅनडा येथील Pizza Hutने Serve Robotics सोबत पार्टनरशिप केली होती. यामध्ये त्यांनी घरोघरी पिझ्झा डिलिवरी (pizza) करण्याकरिता दोन आठवडे प्रयोग केला. हा प्रयोग व्हॅंकुव्हर शहरात रोबोटमार्फत करण्यात आला. इतर शहरांतही हा प्रयोग करण्यात येणार आहे. या चाचणीवेळी ग्राहक Pizza Hut मोबाईल अॅप वापरून पदार्थ ऑर्डर करू शकतात. त्यानंतर ग्राहकाने ऑर्डर केलेला पदार्थ रोबोट लोकेशन ट्रॅक करून ग्राहकांपर्यंत पोहोचवतो.

या चाचणीदरम्यान ग्राहक Pizza Hut मोबाईल अॅपचा वापर करून पदार्थांची ऑर्डर करू शकतात. त्यानंतर रोबोटचे लोकेशन ट्रॅक (Location track) करण्यासाठी ग्राहक हे अॅप वापरू शकतात. ग्राहकांना ऑर्डर दिल्यानंतर एक युनिक पिन क्रमांक दिला जातो, या पिन क्रमांकाच्या मदतीने रोबोटची ऑर्डर ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते. डिलिव्हरी बॉय जसे ग्राहकांपर्यंत त्यांच्या पदार्थांची ऑर्डर घेऊन पोहोचतो त्याचप्रमाणे रोबोटमार्फत राबवण्यात येणार आहे. फक्त येथे व्यक्तिऐवजी रोबोट ग्राहकाने दिलेली ऑर्डर पूर्ण करणार आहे. 

वाचा : Web series पाहून फिल्मी स्टाईलने बँकेच्या तिजोरीवर डल्ला; यामध्ये तुमचे पैसे तर नाहीत?

Serve Robotics चे सीईओ अली कशानी यांनी सांगितले की, ‘आमचे वितरण वाढावे यासाठी आम्ही उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.’, तर कॅनडातील पिझ्झा हटचे डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख म्हणाले की, ‘कॅनडातील डिलिव्हरी तंत्रज्ञानाच्या भविष्यासाठी हे एक रोमांचक पाऊल आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर आता आपण स्मार्टफोन आणि इंटरनेटवरून रोबोटच्या जगाकडे वाटचाल करत आहोत.

ऑनलाइन (online) खरेदी आणि उत्पादन वितरण यामध्ये येत्या काही वर्षांत बदल होण्याची शक्यता आहे. यामध्ये व्यक्तिऐवजी रोबोट (robo) तुमच्या वस्तू घेऊन घरी येईल. ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही, पण यावर काम सुरू झाले असून येत्या काही दिवसांत हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग होणार आहे.