Samsung Galaxy Combo Deal: तुम्ही एखादा प्रीमियम फोन घेण्याचा विचार करत असाल आणि महागड्या किंमतीमुळे तुम्हाला तो विकत घेता येत नसेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सॅमसंगचा फोल्डेबल फोन आणि स्मार्ट वॉच अगदी 50 टक्के किंमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी सध्या उपलब्ध आहे. खरं तर फोल्डेबल स्मार्टफोनबद्दल लोकांमध्ये फारच क्रेझ आहे. मात्र या फोनच्या किंमती सध्याही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. सॅमसंगचा गॅलेक्सी झेड फोल्ड थ्री (Samsung Galaxy Z Fold 3) हा असाच एक फोन आहे. लूक आणि डिझाइनबद्दल विचार केल्यास हा फोन सध्याच्या घडीला आघाडीच्या फोल्डेबल फोन्सपैकी एक आहे. हा फोन टेकप्रेमींमध्ये फारच लोकप्रिय आहे. मात्र त्याची किंमतही तितकीच अधिक आहे. मात्र आता अॅमेझॉनने हा फोन गॅलेक्सी वॉचसहीत विशेष किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध करुन दिला आहे. विशेष म्हणजे या खास ऑफरमध्ये हा फोन फारच स्वस्तात मिळत आहे.
या फोनबरोबर गॅलेक्सी वॉच फोर (Galaxy Watch 4) विकत घेतलं तर एकूण 2 लाख 1 हजार 998 रुपये मोजावे लागतील. मात्र हे जबरदस्त कॉम्बीनेशन अर्ध्या किंमतीत विकत घेण्याची संधी अॅमेझॉनने उपलब्ध करुन दिली आहे. सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड थ्रीवर अॅमेझॉनने घसघशीत सूट दिली आहे. विशेष म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड थ्रीबरोबरच गॅलेक्सी वॉच फोर असं कॉम्बिनेशन घेतलं तरी दोन्ही प्रोडक्टवर मोठी सूट देण्यात आली आहे. अॅमेझॉन सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड थ्री आणि गॅलेक्सी वॉच फोरच्या कॉम्बोवर 49 टक्क्यांची मोठी सूट देत आहे. या कॉम्बोची किंमत आधी 2 कोटी 1 हजार 998 इतकी होती. मात्र स्पेशल ऑफर अंतर्गत या दोन्ही गोष्टी 1 कोटी 2 हजार 999 रुपयांना अॅमेझॉनवर उपलब्ध आहेत.
याशिवाय या खरेदीचं पेमेंट यस बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन केल्यास 1500 रुपयांची सूट मिळेल. या कार्डवरुन किमान 12 हजार रुपयांपर्यंतची खरेदी केल्यास 1500 रुपयांची सूट दिली जाते. त्यामुळे हे कार्ड वापरल्यास फोन आणि स्मार्ट वॉच 1 लाख 1 हजार 499 रुपयांना विकत घेता येईल. याशिवाय या खरेदीवर अॅमेझॉन सहा महिन्यांसाठी स्फोर्टीफाय प्रीमियमचं सहा महिन्यांचं सबस्क्रीप्शन मोफत देत आहे. सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड थ्री हा फोन 2021 मध्ये लॉन्च करण्यात आला. या फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच यात 12 मेगापिक्सल वाइड, 12 मेगापिक्सल अल्ट्रावाइड आणि 12 मेगापिक्सल टेलीफोटो लेन्सचा समावेश आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट देण्यात आली आहे. फोनचा प्रायमरी डिस्प्ले 7.6 इंचाचा असून कव्हर डिस्प्ले 6.2 इंचाचा आहे.