SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आता ATM मधून पैसे काढण्यासाठी...

SBI ATM Cash Withdrawal Rule: तुमचेही या सरकारी बँकेत खाते असल्यास आणि तुम्ही एटीएमद्वारे (ATM) पैसे काढत असाल तर आतापासून तुम्हाला पैसे काढण्यासाठी विशेष नंबरची आवश्यकता असणार आहे.   

Updated: Oct 3, 2022, 03:42 PM IST
SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; आता ATM मधून पैसे काढण्यासाठी...  title=

SBI ATM Withdrawl Rule Changed: SBI च्या ग्राहकांसाठी कामाची बातमी आहे. बँकेने आता एटीएममधून (ATM) पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत. आता एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला एक विशेष क्रमांक द्यावा लागेल. जर तुम्ही हा नंबर टाकला नाही तर तुमचे पैसे अडकणार. दरम्यान एटीएम व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी बँकेने हे पाऊल उचलले आहे. या नियमाबद्दल जाणून घेऊया. (sbi atm cash withdrawal rules on otp based sz)

बँकेने दिलेल्या माहितीनुसार या नवीन नियमानुसार ग्राहक ओटीपीशिवाय (OTP) पैसे काढू शकत नाहीत. पैसे काढण्याच्या वेळी ग्राहकांना त्यांच्या मोबाइल फोनवर एक ओटीपी मिळेल तो नंबर टाकल्यानंतरच एटीएममधून (ATM) पैसे काढले जातात.

बँकेने माहिती दिली

ग्राहकांचे एटीएम व्यवहार सुरक्षित करण्यासाठी बँकेने ओटीपी आधारित व्यवहार सुरू केले आहेत. ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहावेत हा या सुविधेचा मुख्य उद्देश आहे. 

काय आहेत नियम?

ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी बँकेने 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्यावर नवीन नियम लागू केले आहे. या अंतर्गत एसबीआय ग्राहकांना त्यांच्या एटीएममधून प्रत्येक वेळी त्यांच्या बँक खात्यातून नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि डेबिट कार्ड पिनवर पाठवलेल्या ओटीपीसह 10,000 रुपये आणि त्याहून अधिक रक्कम काढण्याची परवानगी देते. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.

येथे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

- यासाठी तुम्हाला एक ओटीपी लागेल, त्याशिवाय तुम्ही पैसे काढू शकणार नाही.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.
- हा OTP चार अंकी क्रमांक असेल जो ग्राहकाला एका व्यवहारासाठी मिळेल.
- तुम्ही काढू इच्छित असलेली रक्कम टाकल्यानंतर तुम्हाला ATM स्क्रीनवर OTP टाकण्यासाठी सांगितल जाईल. 
- रोख पैसे काढण्यासाठी तुम्हाला या स्क्रीनमध्ये बँकेत नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP टाकावा लागेल. 

वाचा : आता घरबसल्या काढता येईल Driving Licence, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

बँकेने हे पाऊल का उचलले?

OTP आधारित रोख पैसे काढण्याची गरज का आहे? बँकेच्या प्रश्नावर म्हणाले, 'ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.' वास्तविक, SBI ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. भारतात 71,705 बीसी आउटलेटसह 22,224 शाखा आणि 63,906 ATM/CDM चे सर्वात मोठे नेटवर्क आहे. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अंदाजे 91 दशलक्ष आणि 20 दशलक्ष आहे.