खूशखबर ! आता सिमकार्डच बनणार मेमरीकार्ड

मोबाईलमधली आणखी एक जागा कमी होणार...

Updated: Feb 23, 2020, 04:37 PM IST
खूशखबर ! आता सिमकार्डच बनणार मेमरीकार्ड title=

मुंबई : आज अनेक फोन्समध्ये सिमकार्ड आणि मेमरी कार्डचा स्लॉट वेगवेगळा असतो. तर काही ड्युअल सिम फोनमध्ये एका ठिकाणी मेमरी कार्ड किंवा सिम कार्ड दोघांपैकी एकच गोष्ट टाकू शकतो. पण आता सिमकार्डच मेमरी कार्डचं काम ही करणार आहे. ही गोष्ट लवकरच मोबाईलमध्ये येणार आहे. चीनची मोबाईल कंपनी शाओमी (Xiaomi) असं एक सिमकार्ड डेव्हलप करत आहे. जो सिमकार्डसोबत माइक्रोएसडी कार्डचं देखील काम करेल. त्यामुळे स्मार्टफोनध्ये विशेष अशी वेगळी जागा देण्याची गरज भासणार नाही. 

अनेक प्रीमियम स्मार्टफोनमध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट नसतं. iPhone 11 आणि Google Pixel 4 मध्ये माइक्रोएसडी कार्ड स्लॉट नाही. 

शाओमीने काही दिवसांपूर्वीच हे स्पेशल कार्ड पेटेंट केलं आहे. भविष्यात जर स्मार्टफोनमध्ये एसडी कार्ड स्लॉट नसेल तर सिमकार्ड हेच एसडी कार्डचं काम करेल. शाओमीच्या डुअल कार्डमध्ये एकीकडे सिम कार्ड टेक्नोलॉजी असेल तर दुसरीकडे माइक्रोएसडी कार्डती टेक्नोलॉजी असेल.

स्टोरेज टेक्नोलॉजी ही अशा पद्धतीत बनवली असू शकते की, फक्त रेडमी आणि शाओमीच्याच मोबाईलमध्ये हे वापरता येईल.

पेटेंटनुसार लवकरच असं सिमकार्ड येण्याची शक्यता आहे. मोबाईल कंपन्या रोज नवीन नवीन टेक्नोलॉजी विकसित करत असतात. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्नोलॉजीवर कंपन्या काम करत असतात.

तसेच सध्या ई-सिमची देखील चर्चा आहे. याआधी सिंगल मोठ्या आकाराचे सिमकार्ड येत होते. पण येणाऱ्या काळासोबत त्यात बदल होत आहेत.