मुंबई : स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला आहे. फोनमध्येही Apps आवश्यक आहेत. प्रत्येक कामासाठी वेगवेगळे Apps असतात. परंतू स्मार्टफोन वापरकर्त्यांना सावध करणारा अहवाल समोर आला आहे. धोकादायक स्पायवेअर वेळोवेळी Google Play Store वर पोहोचतात. सायबर सुरक्षा कंपनी ट्रेंड मायक्रोच्या ताज्या अहवालात असे सूचित केले आहे की, प्ले स्टोअरवरील 200 हून अधिक Android Appsमध्ये फेसस्टीलर नावाचा धोकादायक स्पायवेअर आहे जो केवळ वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटाच नाही तर Facebook पासवर्ड आणि इतर अनेक तपशील देखील चोरू शकतो.
FaceStiller स्पायवेअरसह Trend Micro ला 40 हून अधिक बनावट क्रिप्टोकरन्सी मायनर अॅप्स सापडले जे क्रिप्टो संपत्ती चोरण्याचा आणि वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय संवेदनशील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत होते.
अहवालात असे म्हटले आहे की त्यापैकी काही App 100,000 हून अधिक जणांनी इंस्टॉल केले होते. त्यातील काही अॅप्स चोरून संवेदनशील वापरकर्त्याची माहिती गोळा करत होते.
1. डेली फिटनेस ओएल (Daily Fitness OL)
2. पैनोरमा कैमरा (Panorama Camera)
3. बिजनेस मेटा मैनेजर (Business Meta Manager)
4. स्वैम फोटो (Swam Photo)
5. एन्जॉय फोटो एडिटर (Enjoy Photo Editor)
6. क्रिप्टोमाइनिंग फार्म योर ओन कॉइन (Cryptomining Farm Your own Coin)
7. फोटो गेमिंग पजल (Photo Gaming Puzzle)
या सर्व Appsमध्ये हजारो इंस्टॉलेशन्स आहेत. अहवालानुसार, Google ने स्पायवेअरची दखल घेतली आहे आणि फेसस्टिलरमधून संशयीत Apps तात्काळ काढून टाकले आहेत. दरम्यान, ज्या वापरकर्त्यांनी यापैकी कोणतेही Apps त्यांच्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केले आहेत. त्यांनी ते ताबडतोब काढून टाकावे.