'ही' एक चूक केली तर, whatsapp कायमचं बंद होईल

हा संदेश येताच व्हा सतर्क 

Updated: May 26, 2019, 11:29 AM IST
'ही' एक चूक केली तर, whatsapp कायमचं बंद होईल title=

मुंबई : दैनंदिन जीवनशैलीमध्ये गेल्या काही वर्षांपासून तंत्रज्ञानानेही तितकीच महत्त्वाची जागा गेतली आहे. याच तंत्रज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे व्हॉट्सअप. जगभरातील असंख्य मोबाईल धारकांच्या वापरात असणाऱ्या या मेसेजिंग अॅपमध्ये जरासा बिघाड झाला तरीही गोष्टी सुधरत नाहीत. अशातच तुम्ही एक चूक करण्यापासून कायम दूर राहा, नाहीतर हेच व्हॉट्सअप कायमचं बंद होऊ शकतं. 

हा संदेश येताच व्हा सतर्क 
व्हॉट्सअप वापरतेवेली Temporarily banned असा मेसेज/ संदेश तुम्हाला दिसू लागल्यास सावध व्हा. कारण, तुम्ही या अॅपच्या अधिकृत व्हर्जनऐवजी एखादं अनसपोर्टेड व्हर्जन वापरत असल्याचाच हा इशारा आहे. त्यामुळे लगेचच सपोर्टेड व्हर्जन वापरण्यास सुरुवात करा, नाहीतर व्हॉट्सअप कायमचं बंद होऊ शकतं. 

'थर्ड पार्टी अॅप'ला व्हॉट्सअप सपोर्ट करत नाही 
WhatsApp Plus आणि GB WhatsApp हे अनसपोर्टेड व्हर्जन व्हॉट्सअपची अनधिकृत प्रत आहेत. दुसऱ्याच कोणाकडून हे अॅप डेव्हलप करण्यात आले आहेत. ज्यांच्या माध्यमातून अनेक नियमांचंही उल्लंघनही केलं जातं. या अॅपला व्हॉट्सअप सपोर्ट करत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने ही पावलं उचलण्यात येत आहे. 

चॅट हिस्ट्रीचा बॅकअप घ्या 
व्हॉट्सअपच्या अधिकृत व्हर्जनचा वापर करण्यासाठी लगेचच चॅट हिस्टरीचा बॅकअप घ्या. तुम्हाला बॅकअप घ्यायचा आहे की नाही, हे तुमच्या मोबाईलमध्ये कोणत्या व्हॉट्सअपचं व्हर्जन आहे, यावरुन ठरवलं जाईल. मोबाईलमधील अनधिकृत व्हर्जनचं नाव माहिती करुन घेण्यासाठी More Options > Settings > Help > App info पाहा. जर WhatsApp Plus किंवा GB WhatsApp किंवा इतर कोणतं अॅप वापरत असाल, तर चॅट बॅकअप घेण्याला प्राधान्य द्या.