सावधान! तुम्हीही ZOOM APP वापरताय?, सरकारने दिली धोक्याची सूचना

ZOOM अॅप लवकरात लवकर अपडेट करण्याचा सल्ला सरकारने दिला

Updated: Sep 19, 2022, 05:53 PM IST
सावधान! तुम्हीही ZOOM APP वापरताय?, सरकारने दिली धोक्याची सूचना title=

Technology: कोरोनानंतर अनेकांचे आयुष्यात बदल झाला. तसेच कामाच्या पद्धती देखील बदलल्या. सर्व प्रकारचे, सरकारी आणि प्राईवेट कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले. मोठमोठ्या कंपनीच्या मिटिंग देखील ऑनलाईनरित्या घेतल्या जाऊ लागल्या. शाळाचे तास देखील ऑनलाईन पद्धतीने सुरू होते. यामध्ये ZOOM मिटिंगवर अनेकांचा भर राहिला. एवढंच काय तर, सेमिनार देखील ZOOM वर आयोजित केले जाऊ लागले. मात्र, आता तुम्ही जर ZOOM वर मिटिंग्स घेत असाल तर महागात पडू शकतं. (Technology NewsThe government advised to update the ZOOM app as soon as possible due to Hackers attack)

ZOOM मध्ये काही सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. या त्रुटी आढळल्यानंतर सरकारने युझर्सला खबरदारीचा इशारा दिला आहे. तुम्ही वापर असलेला ZOOM अॅप लवकरात लवकर अपडेट करण्याचा सल्ला सरकारने दिलाय. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजेच CERT-In सायबर सुरक्षा धोक्यांशी निगडीत माहिती दिली.

Hackers चा धोका-

ZOOM मध्ये आढळलेल्या या त्रुटींमुळे, हॅकर्स मीटिंगमध्ये सामील झालेल्या इतर लोकांच्या संपर्कात न येता मीटिंगमध्ये सामील होऊ शकतात. त्यामुळे कंपनीचा महत्त्वाचा डाटा धोक्यात येऊ शकतो. त्याचबरोबर तुमची खासगी माहिती देखील हॅक केली जाऊ शकते. कंपनीच्या गोपनिय माहिती देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाने म्हणजेच MeitY ने मिडीयम धोक्याच्या पातळीचा इशारा दिला. सरकारने सुचना देण्याआधी ZOOM ने युझर्सला सावधगिरीचा सल्ला दिलाय.

लगेच हे काम करा-

स्वत:च्या आणि कंपनीच्या सुरक्षेसाठी युझर्सने आपला Computer वरील आणि Laptop वरील ZOOM चे लेटेस्ट वर्जन अपडेट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मोबाईलमधील अॅप देखील अपडेट करून घ्या, असा सल्ला देण्यात आलाय.