मुंबई : जर तुम्ही स्कूटर ती देखील इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. इलेक्ट्रीक स्कूटर बनवणारी कंपनी, टेको इलेक्ट्राने आपल्या स्कूटर्सच्या किंमती कमी केल्या आहेत. पुण्याची ही कंपनी आहे. या कंपनीचे तीन मॉडेल्स आहेत. Neo, Raptor आणि Emerge.
आधी Neo मॉडेलची किंमत 43 हजार 967 होती, ती आता 41 हजार 557 झाली आहे, तर Raptor मॉडेलची किंमत 60 हजार 771 रूपये होती, ती आता 57 हजार 423 रूपये झाली आहे, तसेच सर्वात जास्त किंमतीची Emerge ची किंमत 72 हजार 247 रूपये होती, ती आता 68 हजार 106 रूपयांना मिळणार आहे.
सरकारकडून इलेक्ट्रीक गाड्यांवर लावला जाणारा 12 टक्के जीएसटी आता, कमी करून 5 टक्के करण्यात आला आहे. इलेक्ट्रीक गाड्यांची विक्री वाढावी. हा त्यामागील उद्देश आहे.
टेको इलेक्ट्राची स्कूटर Neo ही बेसिक मॉडेल आहे, तर Raptor मिड रेंजला आहे. इमर्ज हे मॉडेल स्टॅडर्ड लेव्हलला आहे, जी लिथियम आयन बॅटरीवर चालते. नियो आणि रॅप्टर लीड अॅसिड बॅटरीवर चालतात.