भारताची शान 'रॉयल एनफील्ड'चा कस्टमाईज्ड लूक पाहिलात का?

रॉयल एनफील्डनं फ्रान्समध्ये सुरु असलेल्या २०१७ विल्ज अॅन्ड एग्झिबिशनमध्ये दोन कस्टमाईज बाईक सादर केल्यात. 

Updated: Jun 28, 2017, 05:13 PM IST
भारताची शान 'रॉयल एनफील्ड'चा कस्टमाईज्ड लूक पाहिलात का? title=

नवी दिल्ली : रॉयल एनफील्डनं फ्रान्समध्ये सुरु असलेल्या २०१७ विल्ज अॅन्ड एग्झिबिशनमध्ये दोन कस्टमाईज बाईक सादर केल्यात. 

पाहिल्या पाहिल्या लोकांना या 'रॉयल एनफिल्ड'च्या बाईक आहेत हे ध्यानातही आलं नाही... अनेकांना या बाईक म्हणजे परदेशी बनावटीच्या लाखो रुपयांच्या घरात किंमती असलेल्या महागड्या बाईक वाटल्या. 

 

रॉयल एनफिल्डच्या या बाईक्स लंडन बेस्ड कस्टम कंपनी सिनरोजा मोटरसायकल्सनं कस्टमाईज केल्यात. 

अतिशय शानदार पद्धतीनं दमदार अशा रॉयल एनफिल्डच्या या बाईक कस्टमाईज्ड करण्यात आल्यात. 

 

कंपनीनं रॉयल एनफील्ड हिमालयन (Royal Enfield Himalayan) मधून बनलेली जेंटलमेन ब्रॅट (Gentleman Brat) आणि रॉयल एनफील्ड कॉन्टीनेंटल (Royal Enfield Continental GT) मधून बनवलेली सर्फ रेसर (Surf Racer) या दोन बाईक सादर केल्या. 

 

सर्फ रेसरमध्ये ओरिजिनल ५३५ सीसी इंजिन आहे. यामध्ये मशीन्ड पिस्टन बॅरल्स जोडलेत. सोबतच रॉयल एनफिल्ड हिमालयन जेंटलमन ब्रॅटची सीट कस्टमाईज्ड करण्यात आलीय. 

जेंटलमेन ब्रॅटमध्ये टेल माऊंटेन एग्जॉस्ट केनिस्टर दिलं गेलंय. या बाईकमध्ये गोल हेडलाईट आणि इंडिकेटर्स याला रेट्रो लूक देतात. बाईकची फ्रेम छोटी करण्यात आलीय... त्यामुळे या बाईकचा चेहरा-मोहराच बदलून गेलाय.