मुंबई : बॅंकमध्ये जाऊन ट्रान्झॅक्शन करण्यापेक्षा आजकाल डिजिटल पेमेंटला ऊत आलाय. जो तो स्कॅन कोड स्कॅन करून युपीआयद्वारे मोबाईल फोनद्वारे पे करतोय. मात्र कधी-कधी हे पेमेंट करण्यास अडथळा येतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला ऑफलाईन पेमेंट कसे करावे याची पद्धत सांगणार आहोत.
Google Pay, Paytm, PhonePe यांसारख्या अॅप्सवरून पैसे पाठवताना इंटरनेट काम करत नाही. अशा परिस्थितीत UPI आधारित डिजिटल पेमेंट शक्य नाही. पण, तुम्ही इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला USSD कोडची मदत घ्यावी लागेल. या सेवेद्वारे, तुमच्या फोनमध्ये इंटरनेट किंवा मोबाइल डेटा काम करत नसला तरी तुम्ही पेमेंट करू शकता. मात्र, यासाठी मोबाईलमध्ये नेटवर्क असणे आवश्यक आहे. म्हणजेच, जर तुम्ही कॉल करू शकत असाल, तर तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.
तुम्हाला मोबाईलवर *99# डायल करावे लागेल. ही USSD सेवा वापरून, तुम्ही UPI मधून पैसे ट्रान्सफर करू शकता. म्हणजेच या सेवेमध्ये इंटरनेट नसेल तरी आपत्कालीन परिस्थितीत पेमेंट करता येणार आहे.
असे करा ऑफलाईन पेमेंट
दरम्याना या ऑफलाईन पद्धतीने आता तुम्हाला विना इंटरनेट पेमेंट करता येणार आहे.