व्होडाफोनने आणला ९९९ रूपयांत 4G स्मार्टफोन

टेलिकॉम इंडस्ट्रीमधील किंमती आणि डाटा वॉर चा सर्वाधिक फायदा ग्राहकांना मिळत आहे. 

Updated: Oct 24, 2017, 04:12 PM IST
व्होडाफोनने आणला ९९९ रूपयांत 4G स्मार्टफोन  title=

नवी दिल्ली : टेलिकॉम इंडस्ट्रीमधील किंमती आणि डाटा वॉर चा सर्वाधिक फायदा ग्राहकांना मिळत आहे. 

जिओ त्यानंतर एअरटेल आणि आता व्होडाफोननेदेखील किफायतशीर किंमतींमध्ये 4G चा स्मार्टफोन आणला आहे.व्होडाफोनचा स्मार्टफोन केवळ १३९९ रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. व्होडाफोनने मायाक्रोमॅक्ससोबत येऊन Bharat 2 Ultra 4G स्मार्टफोन ग्राहकांसाठी आणला आहे. ऑफरचा फायदा घेऊन स्मार्टफोन विकत घेण्यासाठी सुमारे २८९९ रूपये मोजावे लागणार आहेत. 

अट काय आहे ? 

व्होडाफोनच्या ऑफरचा वापर करून तुम्ही स्मार्टफोन विकत घेणार असाल तर याकरिता २८९९ रूपये द्यावे लागणार आहेत. 
यानंतर 3 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला तुम्हांला १५० रूपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. हा रिचार्ज तुम्ही सलग १८ महिने केल्यास कंपनी तुम्हांला १८ महिन्यांनंतर ९००  रुपये परत केले जातील. त्यापुढील १८ महिन्यांनंतर १००० रूपये परत केले जातील.  अशाप्रकारे तुम्हांला १९०० रूपयांचा कॅशबॅक ९९९ रूपयांमध्ये उपलब्ध होईल. 

फोनचे खास फीचर्स - 
माइक्रोमॅक्स भारत 2 अल्ट्रा या फोनमध्ये १.३ गीगा हर्टझ क्वॉडकोर प्रोसेसर आहे. 
512MB रॅम आहे. 
4GB इंटरनल मेमरी 
फोन स्टोरेज वाढवण्यासाठी एसडी कार्डाची सोय 
 2 MP  रिअर कॅमेरा आणि सेल्फीसाठी VGA कॅमेरा 
 1,300mAh बॅटरी 
कनेक्टिविटी साठी  4G सोबत Wi-Fi

कुठे आणि कधी मिळणार ? 
या फोनची विक्री व्होडाफोन स्टोअरमध्ये होणार असून रिटेल स्टोरमध्येही नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून या फोनची विक्री सुरू केली जाईल.  

कंपनीने अजुनही १५० रूपयांमध्ये डाटा किती मिळणार तसेच कॉलिंगची सुविधा कशी दिली जाणार याबाबतची माहिती दिलेली नाही.