व्हॉट्स अॅपचं नवं फिचर, तुम्ही वापरलंत का?

 व्हॉट्स अॅपवर आता फेसबूकप्रमाणेच रंगीत स्टेटस शेअर करता येणार आहे.

Updated: Aug 10, 2017, 06:14 PM IST
व्हॉट्स अॅपचं नवं फिचर, तुम्ही वापरलंत का?

मुंबई : व्हॉट्स अॅपवर आता फेसबूकप्रमाणेच रंगीत स्टेटस शेअर करता येणार आहे. व्हॉट्स अॅपनं आणलेल्या अपडेटमध्ये ही सुविधा यूजर्सना मिळाली आहे. फेसबूकप्रमाणेच व्हॉट्सअॅपवरही स्टेटस शेअर करताना बॅकग्राऊंडचा रंग निवडण्याचा ऑप्शन यूजर्सना मिळाला आहे.

बॅकग्राऊंडचा रंग निवडण्यासाठी यूजरला पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करावं लागणार आहे. पेन्सिलचा हा आयकॉन व्हॉट्स अॅपच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला खाली देण्यात आला आहे. व्हॉट्स अॅपचं हे नवं फिचर अजून सगळ्यांसाठी उपलब्ध झालेलं नाही. व्हॉट्स अ‍ॅपच्या व्ही 2.17.291 या बीटा आवृत्तीचा वापर करणार्‍या काही युजर्सला यावर क्लिक केल्यानंतर कॅमेर्‍याच्यावर पेन्सिलचा आयकॉन दिसू लागला आहे.