मुंबई : मोबाईलमध्ये सर्वाधिक पसंतीच आणि सर्वात जास्त वापरलं जाणाऱ्या व्हॉट्सएपमध्ये नेहमी नवनवे बदल होतं असतात. युजर्सला चॅटींगचा सोपा अनुभव देण्यासाठी हे बदल होत असतात. इंस्टंट मॅसेजिंग एप व्हाट्सएप युजर्सना गेले काही दिवस एक अडचण सतावतेय. यामध्ये पिक्चर इन पिक्चर (PIP) या ऑप्शनचा वापर करता येत नाहीय. WABetaInfo ने यासंदर्भात ट्वीट करत माहिती समोर आणलीय. व्हॉट्सएपमध्ये युट्यूब प्रीव्ह्यू दिसण्यास अडचण येतेय. चॅटमध्ये युट्यूब व्हिडीओ PIP मोडच्या माध्यमातून पाहता येत नाहीय.
WABetaInfo ने केलेल्या ट्वीटनुसार व्हाट्सएपच्या एंड्रॉईड, आयओएस आणि वेब डेस्कटॉपवर ही अडचण येतेयं. युट्यूबकडून यामध्ये बदल केला जातोय. हे फिचर दिसण्यासाठी व्हॉट्सएप अपडेट करण्याची गरज आहे.
WhatsApp is experiencing issues to load the YouTube preview. The PiP does not appear on WhatsApp for iOS, Android and Web/Desktop.
Probably there are some changes for YouTube and it's needed an update to support them.
— WABetaInfo (@WABetaInfo) July 21, 2020
PIP मोडच्या माध्यमातून चॅटमध्ये कोणतीही लिंक पाहीली जाऊ शकते. पण आता जर आलेल्या युट्यूब लिंकवर क्लिक केलं तर चॅट व्हिडीओ प्ले होत नाहीय.
जर तुमच्याकडे व्हॉट्सएप चॅटमध्ये कोणता व्हिडीओ आला तर त्यातून बाहेर न पडता तुम्ही तो पाहू शकता. यासाठी तुम्हाला चॅटमधून बाहेर जाण्याची गरज नसते.
व्हॉट्सएपने नुकतंच क्यूआर कोड हे नवं फिचर लॉंच केलंय. यामुळे व्हॉट्सएप नंबर सेव्ह करण्याची पद्धत बदलली आहे. क्यूआर कोड स्कॅन करुन त्यांच्या लिस्टमध्ये नंबर सेव्ह करणं सोपं झालंय. एंड्रॉइड आणि आयओएस युझर्स देखील सेटींग्जमध्ये जाऊन आपल्या नावासमोर स्वत:च्या कस्टम क्यूआर पाहू शकतात.