कोणत्या फोनमध्ये 5G सेवा चालणार? jio 5G नेटवर्कच्या बातमीनंतर ग्राहकांसमोर मोठा प्रश्न

परंतु आता ग्राहकांच्या मनात एक प्रश्न उपस्थीत होत आहेत की, आमच्याकडे असलेल्या फोनमध्ये 5G नेटवर्क चालणार का?

Updated: Aug 4, 2022, 09:41 PM IST
कोणत्या फोनमध्ये 5G सेवा चालणार? jio 5G नेटवर्कच्या बातमीनंतर ग्राहकांसमोर मोठा प्रश्न title=

मुंबई : जिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये मोठी क्रांती घडवली. यानंतर आता या सेक्टरमध्ये मोठा आणि आधुनिक बदल घडणार आहे. कारण 15 ऑगस्टला जिओ 5G नेटवर्क लाँच करणार आहे. ज्यामुळे इंटरनेट सुविधा फास्ट आणि बफर फ्री होणार आहे. ही खरोखरंच ग्राहकांसाठी एक चांगली गोष्ट आहे. खरंतर जिओ कंपनीने 88 हजार 078 कोटी रुपये खर्च करून 20 वर्षे 5G स्पेक्ट्रम समर्थन केले आहे. कंपनीने लिलावात पाच 5G बँड विकत घेतले आहेत.

5G स्पेक्ट्रमचा लिलाव संपला आहे. जिओने लिलावात सर्वाधिक बँड खरेदी केले आहेत. दूरसंचार कंपनीने 700MHz, 800MHz, 1800MHz, 3300MHz आणि 26GHz बँडमध्ये स्पेक्ट्रम विकत घेतले आहे.

परंतु आता ग्राहकांच्या मनात एक प्रश्न उपस्थीत होत आहेत की, आमच्याकडे असलेल्या फोनमध्ये 5G नेटवर्क चालणार का? की मला आता नवीन फोन विकत घ्यावा लागणार आहे? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.

खरंतर गेल्या दोन वर्षांपासून 5G स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च केले जात आहेत. जे अगदी कमी बजेटच्या फोनमध्ये देखील येऊ लागले आहे

बहुतेक स्मार्टफोन हे 4 किंवा 5 बँड दोन्हीला सपोर्ट करतात. त्याच वेळी, काहींमध्ये 11 ते 12 बँडचा सपोर्ट उपलब्ध आहे. पण प्रश्न असा आहे की दूरसंचार कंपन्या त्यांची 5G सेवा कोणत्या बँडमध्ये देतील? चला तर मग जाणून घेऊ

या बँड्समध्ये Jio 5G उपलब्ध असेल

कंपनीने सर्व 22 सर्कलमध्ये 5G स्पेक्ट्रम सुरक्षित केले आहे. यामध्ये लो-बँड, मिड-बँड आणि एमएमवेव्ह स्पेक्ट्रमचा समावेश आहे. जिओने 700MHz, 800MHz, 1800MHz, 3300MHz आणि 26GHz स्पेक्ट्रम विकत घेतलेले 5 बँड आहेत.

स्मार्टफोनमध्ये सपोर्ट असलेले 5G बँड N-सिरीजपासून सुरू होतात. जर आपण या बँड्सकडे त्या स्वरूपात पाहिले तर कंपनीने N28, N5, N3, N77 आणि N258 बँडमध्ये स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत. यामध्ये, पॅन इंडिया 5G सेवा 700MHz म्हणजेच N28 बँडमध्ये उपलब्ध असेल.

जिओ 5G कनेक्टिव्हिटी कोणाला मिळेल?

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये वर नमूद केलेले बँड असतील, तरच तुम्हाला Jio 5G ची सेवा मिळेल. आता यासाठी आपण नुकत्याच लाँच झालेल्या स्मार्टफोनचा बॅण्ड सपोर्ट पाहू शकता.

iQOO 9T भारतात या आठवड्यात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये n1, n3, n5, n8, n28, n40, n41, n77, n78 बँड समर्थित आहेत. म्हणजेच यात तुमचा Jio 5G काम करेल.

त्याचप्रमाणे Xiaomi ने अलीकडेच Redmi K50i भारतात लॉन्च केला आहे. हे n1, n3, n5, n7, n8, n20, n28A, n38, n40, n41, n77, n78 बँडना सपोर्ट करते. जर तुम्ही जिओच्या बँडवर नजर टाकली तर या फोनमध्येही Jio 5G चालेल.

फोनमध्ये 5G चालेल का हे कसं तपासायचं?

तुम्ही तुमच्या 5G फोनमध्ये बँड सपोर्ट सहजपणे तपासू शकता. यासाठी तुम्हाला स्मार्टफोन ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. आता तुम्हाला तुमच्या फोनचे मॉडेल शोधावे लागेल आणि त्याच्या स्पेसिफिकेशन्स पेजवर जावे लागेल. येथे तुम्हाला कनेक्टिव्हिटी पर्याय मिळेल. तुम्ही 5G समोर दिलेल्या बँडची यादी तपासू शकता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x