मंबई : स्मार्टफोन हे अलिकडील काळातले एक वेगळेच जग. या जगात रमणे आपल्यापैकी अनेकांचा आवडता छंद. त्यामुळे स्मार्टफोनच्या जगतात काय सुरू आहे, याबाबत जाणून घेणे हा अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. अशी उत्सुकता ठेवणाऱ्या मंडळींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शाओमी स्मार्टनचे (Xiaomi Redmi Note 5A)फिचर्स लिक झाले आहेत. केवळ फिचर्सच नव्हे तर या स्मार्टफोनच्या लॉंचींगची डेटही लिक झाली आहे.
सोशल मीडियावर लिक झालेल्या माहितीनुसार, Xiaomi Redmi Note 5A स्मार्टफोन येत्या 21 ऑगस्टला लॉंच केला जाणार आहे. या फोनची किंमतही सर्वसामान्यांना परवडेल इतकी किफायतशीर असेल. पण, सोशल मीडियात चर्चील्या जाणाऱ्या किंमतीत हा फोन 999 युआन (भारतीय रूपयांत 9,600) मध्ये मिळेल, असे म्हटले आहे. या फोनच्या फिचर्सच्या बाबतीत बोलायचे तर, या फोनला 5.5 इंचचाचा फुल एचडी डिस्प्ले मिळेल. ज्याचे रिझोल्यूशन १०८०x१९२० पिक्सल असेन. Xiaomi Redmi Note 5Aला स्नॅपड्रेन 435 soc प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. तसेच, 2GB रॅमही मिळेल, असे समजते. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग 5 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह मिळेन. इंटरनल मेमरी १६ जीबी, तसेच, ३,७९०mAHची बॅटरी मिळेल.
दरम्यान, भारतात पहिल्यापासूनच रेडमी नोट ४, रेडमी४ आणि रेडमी ४A, स्मार्टफोन उपलब्ध आहेत. रेडमी नोट४ चे सुरवातीचे मॉडेल ९,९९९ रूपयांचे आहे. तर, याचेच टॉप मॉडेल १२,९९९ रूपये आहे.