पृथ्वीवरुन मंगळ ग्रहाला कंट्रोल करणारी पहिली भारतीय महिला; अंतराळात रचला नवा इतिहास

india Akshata Krishnamurthy:अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासा  मध्ये भारतीय तरुणी डॉ. अक्षता कृष्णमूर्तीचं कार्य सर्वांना प्रेरित करतेय. मंगळ ग्रहावर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय नागरिक म्हणून अक्षता ओळखली जाते.

Updated: Jan 1, 2024, 02:41 PM IST
पृथ्वीवरुन मंगळ ग्रहाला कंट्रोल करणारी पहिली भारतीय महिला; अंतराळात रचला नवा इतिहास    title=

वॉशिंगटन: अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (NASA)मध्ये  अतुलनीय कामगीरी अक्षताने केली आहे. अंतराळात काम करण्याची ईच्छा असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अक्षता हे उत्तम प्रेरणादायी उदाहरण आहे.अक्षता ही मंगळ ग्रहावर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय नागरिक आहे. तिच्या या  कामगिरीने अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास रचला गेला आहे.  सोशल मिडियावर अक्षताने केलेली एक पोस्ट सर्वांना प्रेरणा देणारी आहे. 30 नोव्हेंबर दरम्यान तीने सोशल मिडीयावर एक विडीओ पोस्ट केला होता. या विडिओतून नव्या वर्षाच्या सुरुवातीस अक्षताने दिलेला सल्ला आपण अंगीकारुन ध्येय प्राप्त करु शकतो. या पोस्ट मध्ये अक्षता सांगते की   “हे माझ्यासाठी शक्य नाही, म्हणून मी माझं क्षेत्र बदलावं. पण मी जिद्द सोडली नाही. आपलं काम करत राहिले. पीएचडी पूर्ण केल्यानंतर मला नासामध्ये नोकरी मिळाली. काम करायचं  असेल तर वेडेपणा असावा लागतो.

 

अक्षताने MIT ( मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) मधून पीएचडी केली आहे. अक्षता ही नासा मध्ये  इन्वेस्टिगेटर  आणि मिशन सायन्स फेज लीड्स या पदावर आहे. ती  गेली 5 वर्षे नासा मध्ये काम करत आहे. अक्षता नासाच्या त्या मोहिमेमध्ये सहभागी होती ज्यामध्ये अंतराळ संस्था मंगळ ग्रहावरील नमुने गोळा करत होती. या मोहिमे दरम्यान तिने मंगळ ग्रहावर रोव्हर चालवून एक मोठी कामगिरी पार पाडली होती.

13 वर्षांपूर्वी सुरु झाला होता प्रवास 
नासापर्यंत पोहचण्याचा अक्षताचा प्रवास हा 13 वर्षांपूर्वीच सुरु झाला होता. नासामध्ये काम करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षताही अमेरिकेला पोहचली होती. बाहेरील देशात जाऊन नोकरी करणं या प्रवासात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. अक्षता सांगते की, 'मला अनेकांनी सांगितलं होतं हे काम तुझ्याकडून होणार नाही.  तु तुझ्या स्वप्नांचा पुन्हा एकदा विचार कर'.  यामध्ये अक्षताने कुणाचही न ऐकता आपल्या ध्येयावर ठाम राहुन आपलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत राहीली. सोशल मिडीयावरील पोस्टमध्ये अक्षताने सांगितलं आहे की 'MIT मध्ये  पीएचडी करण्यापासून ते नासा मध्ये  रुजू होण्यापर्यंतच्या प्रवासात 100 दारं ठोकावी लागली होती. या प्रवासात कोणतीच गोष्ट सोप्पी नव्हती.  कोणतंही स्वप्न अवघड नसतं. स्वत:वर विश्वास ठेवा आणि प्रंचड मेहनत करा, तुम्हाल तुमचे यश नक्की मिळेल.  मला दहा लाख लोकांना मोठी स्वप्न पाहण्यासाठी आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा द्यायची आहे. माझं हे एकचं ध्येय आहे. ” आज  अक्षता कित्येक वेगवेगळ्या अंतराळ मोहिमेसाठी काम करतेय.