मुंबई : वयाप्रमाणे महिलांच्या शरीरातंही बदल होताना दिसतात. शरीरात होणारे हे बदल विविध पद्धतीचे असतात. महिलांना वयाच्या जवळपास 45 ते 50 वयाच्याजवळ मेनोपॉजचा सामना करावा लागतो. स्त्रियांमध्ये मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये मासिक पाळी येणं बंद होतं आणि शरीरात विविध हार्मोनल बदल होऊ लागतात.
स्त्रिया अनेकदा मेनोपॉजसंदर्भात गोंधळलेल्या असतात. त्याचप्रमाणे रजोनिवृत्तीबद्दल महिलांच्या मनात अनेक गैरसजम असतात. मात्र याबाबत महिलांना सत्यता माहिती असणं गरजेचं आहे. जाणून घेऊया मेनॉपॉजदरम्यान महिलांच्या मनात असलेल्या गैरसमजुती.
शरीरात होत असलेल्या हार्मोनल बदलांमुळे प्रत्येक स्त्रीला रजोनिवृत्तीच्या प्रक्रियेतून जावं लागतं. मुळात हा काही आजार नाही ज्यावर उपचार केले जाऊ शकतात. त्यामुळे हा एक गैरसमज आहे.
मेनोपॉजनंतर सेक्स लाईफ संपते अशा अनेक महिलांचा समज असतो. मात्र असं काही नाहीये. रजोनिवृत्तीनंतर काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही ही समस्या टाळू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
रजोनिवृत्तीच्या काळात मासिक पाळी पूर्णपणे थांबते असा भ्रम महिलांना अनेकदा असतो. मात्र यामध्ये सत्यता नसून हा निव्वळ भ्रम आहे. मुळात रजोनिवृत्ती ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये मासिक पाळी येणं हळूहळू थांबतं.