Cow Milk : बापरे! एक गाय देणार 140 लिटर दूध; सुपर गायीबद्दल ऐकलंत का?

प्रयोगाचा एक भाग म्हणून गायीवर संशोधन करण्यात आलं. हे संशोधन यशस्वी झालं आणि त्यामुळे आता एक गाय 140 लिटर दूध देऊ शकणार आहे.

Updated: Feb 6, 2023, 09:50 PM IST
Cow Milk : बापरे! एक गाय देणार 140 लिटर दूध; सुपर गायीबद्दल ऐकलंत का? title=

Cow Milk : माणसांसोबतच प्राणी आणि पक्ष्यांवरही वैज्ञानिक प्रयोग सुरु आहेत. अशाच प्रयोगाचा एक भाग म्हणून गायीवर संशोधन करण्यात आलं. हे संशोधन यशस्वी झालं आणि त्यामुळे आता एक गाय 140 लिटर दूध देऊ शकणार आहे. हा दावा चीनमधल्या शास्त्रज्ञांनी केलाय.. 

चीनच्या शास्त्रज्ञांनी एका सुपर गाईची यशस्वी क्लोनिंग केलं असून 3 वासरांना जन्म दिलाय. ही सुपर गाय सामान्य गायींपेक्षा जास्त दूध देते. सुपर गाईंमुळे चीन दूध उत्पादनात जगातील आघाडीचा देश बनू शकतो. काय आहेत या सुपर गाईची वैशिष्ठ्यं.. पाहुयात

सुपर गाय कशी आहे? 

  • क्लोनिंगद्वारे सुपर गायीची निर्मिती करण्यात आलीय
  • नेदरलँडच्या होलस्टीन फ्रीसियन जातीचे हे क्लोन आहेत
  • ही सुपर गाय दिवसाला 140 लिटर दूध ही गाय देऊ शकेल
  • सुपर गाय तिच्या संपूर्ण आयुष्यात 100 टन म्हणजेच 2 लाख 83 हजार लिटर दूध देऊ शकेल
  • अमेरिकेतील गायींच्या तुलनेत ही गाय 1.7 पट जास्त दूध देईल

चीनच्या शास्त्रज्ञांची ही कामगिरी देशाच्या डेअरी उद्योगासाठी क्रांतिकारक असल्याचं मानलं जातंय. सुपर गायीच्या यशस्वी क्लोनिंगनंतर चीनमधील डेअरी उद्योगाला चालना मिळणार आहे. तसेच यापुढे चीनला परदेशातून उच्च जातीच्या गायी आयात करण्याची गरज भासणार नाही. मात्र चीन जगाला या गायी निर्यात करतो का याबाबत कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.