प्रवासादरम्यान महिलेच्या अंतरवस्त्रामध्ये लपली पाल; घरी येऊन उघडल्यावर उडाला थरकाप

एक पाल या महिलेच्या ब्रा मध्ये लपली होती ती त्यासोबत 6437 किमीचे अंतर पार करून दक्षिण यार्कशायरमध्ये पोहचली.

Updated: Sep 11, 2021, 11:34 AM IST
प्रवासादरम्यान महिलेच्या अंतरवस्त्रामध्ये लपली पाल; घरी येऊन उघडल्यावर उडाला थरकाप title=

लंडन : सुट्यांचा आनंद घेण्यासाटी एक ब्रिटिश महिला आपल्या घरी पोहचली. त्यावेळी तिच्या सोबत एक पाहुणी देखील आली. एक पाल या महिलेच्या ब्रा मध्ये लपली होती ती त्यासोबत 6437 किमीचे अंतर पार करून दक्षिण यार्कशायरमध्ये पोहचली. परतल्यानंतर जेव्हा सुटकेस उघडली तर, तिला ब्रा मध्ये पाल दिसून आली. महिलेने या पाहुणी पालचे नाव बार्बी ठेवले.

मिरर रिपोर्टनुसार 47 वर्षीय रसेलने सूटकेस अनपॅक करताना जेव्हा आपली ब्रा काढली. तर त्यांना काहीशी हालचाल जाणवली. त्यानंतर तिने अंतरवस्त्र जोरात झटकले तर, एक काळ्या रंगाची पाल बेडवर पडली. आधी रस्सेल घाबरल्या आणि ओरडायला लागल्या. परंतु त्यांनी पाहिले की पाल त्यांच्याहून अधिक घाबरली होती.

Thrybergh मध्ये राहणारी रसेल बारबाडोसमध्ये सुट्या घालवण्यासाठी आली होती. मंगळवारी ती परत गेली तर, तिच्या बॅगमध्ये तिला पाल आढळून आली. रसेल म्हटली की, पालचे नशीब चांगले की, मी ब्रा बॅगच्या सर्वात वर ठेवली होती. नाहीतर ती कपड्यांच्या ओझ्यामुळे गुदमरली असती.