Most Expensive Water: आपल्या पृथ्वीवर पाणी आहे म्हणून आपण आहोत. जर का या धरतीवर पाणी नसते तर मात्र मानवी जीवन तर आपल्याला पाहायलाच मिळाले नसते. पाणी हा आपल्या सर्वांच्याच आयुष्यातला महत्त्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे. प्रत्येकाला मुबलक प्रमाणात स्वच्छ आणि सर्व महत्त्वपुर्ण खनिजं मिळावीत म्हणून सर्वच प्रयत्नशील असतो. परंतु जगात असं एक पाणी आहे ज्याची किंमत ऐकूनच तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. Acqua di Cristallo Tributo a Modigliani हे जगातील सर्वात महागडं असं पाणी मानले जाते. त्यामुळे जगात याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. चला तर मग पाहुया की नक्की या पाण्याची जगभरात इतकी चर्चा का आहे आणि सोबतच हे पाणी इतकं महाग का आहे? या पाण्यात नक्की असं आहे तरी काय? तुम्हाला जाणून घ्यायला आश्चर्य वाटेल परंतु या पाण्याची किंमत ही 50 लाख रूपये वर्तवली गेली आहे. 750 मिलीलीटर पाण्याची ही किंमत आहे. तेव्हा या लेखातून याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
या महागड्या पाण्यानं 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये आपलं नाव कमावलं आहे. तुम्हाला आठवत असेल जेव्हा भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी हेच पाणी IPL च्या एका क्रिकेट सामन्याच्यावेळी हातात घेतलेले पाहायला मिळाले होते आणि तेव्हा त्यांनी या महागड्या बॉटलमधून पाणी प्यायला होते. परंतु नंतर अशीही चर्चा रंगली होती की हा फोटो खोटा होता. परंतु त्यानंतर मात्र या आगळ्यावेगळ्या दिसणाऱ्या पाण्याच्या बाटलीनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. कुठलातरी राजघराण्यातलाच कोणतरी सदस्य हे एवढे महागडे पाणी पिऊ शकत असेल अशीही चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्यामुळे असं पाणी पिण्याची इच्छा तर प्रत्येकानंच व्यक्त केली होती. परंतु त्यातून या पाण्याची किंमत पाहून आपल्याला गाडीही घेणं परवडणार नाही. त्यामुळे फक्त दुरून दिसतं तेवढेच अशी अनेकांच्या मनात भावना निर्माण झाली त्यातून या पाण्याची किंमत ऐकून अनेकांच्या मनात धस्संच झाले होते.
हेही वाचा - 'त्यांच्या शारीरिक गरजा...', OMG 2 च्या निमित्तानं सद्गुरूंनी अक्षय कुमारसाठी लिहिलेली पोस्ट चर्चेत
या पाण्याच्या बाटलीचे पॅकेजिंगही जर का पाहाल तर ते फारच वेगळे आहे. हे पाणी 24 carat सोन्याच्या बाटलीत ठेवलेले आहे. ज्यात सोनंही आहे. Fernando Altamirano या लोकप्रिय डिझायनरनं ही बॉटल डिझाईन केलेली आहे. मुळात या पाण्याच्या बाटलीचेच डिझाईन इतके वेगळे आणि महागडे आहे त्यामुळे या पाण्याची किंमतही फार महाग आहे. Fernando Altamirano हा एक मॅक्सिकन नॅचरलिस्ट, बॉटनिस्ट आणि डिझायनर आहे. Amedeo Clemente Modigliani या कलाकाराला मानवंदना म्हणून ही बाटली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या बाटलीचे नावं हे Acqua di Cristallo Tributo a Modigliani असं आहे.
या पाण्याच्या प्रत्येक थेंबात 5 ग्रॅम सोनं आहे. 24 कॅरेट सोन्यापैंकी या पाण्याच्या प्रत्येक थेंबात सोनं आहे. त्यामुळे या पाण्याची बातच न्यारी आहे. प्लॅनेट फाऊंडेशन ए.सीद्वारे मॅक्सिकोच्या La Hacienda de Los Morales येथे 774,000 Pesos किंवा 60,000 US Dollar इतकी या पाण्याची किंमत आहे. यातून आलेल्या निधीतून ग्लोबल वॉर्मिंग विरूद्ध लढणाऱ्या एका संस्थेला मदत करण्यात आली आहे.